‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवसापासून या नवीन पर्वात ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील पहिला दिवस स्पर्धकांसाठी कठीण गेला. ‘बिग बॉस’च्या घरातील पाणी बंद झाल्याचे पाहायला मिळाले. स्पर्धकांना घरात पाणी नसल्याची जाणीव होते. त्यावेळी ते ‘बिग बॉस’ला घरात पाणी नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचे सांगतात. दिवसाच्या सुरुवातीला सगळ्यात आधी अंघोळ करायची असते. त्यासाठी पाणी पाहिजे असतं. पण, घरात पाणी नाही असे वर्षा उसगांवकर म्हणताना दिसत आहेत. त्यावर आता घरातील पाणी गेले आहे. थोड्याच वेळात सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळेल, असे ‘बिग बॉस’ म्हणतात.
यानंतर ‘बिग बॉस’ घरातील सर्वांसाठी लॅविश ब्रेकफास्ट आयोजित करतात. मात्र यात सर्वांच्या नशिबात नसल्याचे ‘बिग बॉस’ सांगतात. यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात सुरजला निर्णय घेता येणार नाही अशी चर्चा झाली. यानंतर ‘बिग बॉस’ तीन नावे अंतिम करतात. यात धनंजय, इरीना व सुरज ही नावे अंतिम केली जातात. त्यानंतर ‘बिग बॉस’ धनंजयचे कौतुक करतात. याचवेळी ‘बिग बॉस’ त्यांना एक नवीन टास्क देणार आहे. या नवीन टास्कनुसार इरीना, धनंजय व सुरज हे घरातील राशनसाठी गेले आहेत. तेव्हा त्यांच्यातील काही पदार्थवरुन घरात मतभेद होणार आहेत.
यावेळी निक्कीला अंकीताचे वागणे खटकले असल्याचे ती जान्हवीला सांगत आहे. यावेळी ती असं म्हणते की, “निखिलने माझ्यासाठी ब्रेड सावर्लो ब्रेड येत आहे तर तुझ्यासाठी किनोव्हा ब्रेड येईल असं सांगितलं. तेव्हा अंकिताने माझ्याकडे बघून वेगळं तोंड केलं आणि मी हे आरशात बघितलं. यामुळे माझी खूप सटकली. मी तिला सुनावलं असतं. पण भूक खूप लागलेली होती आणि त्यामुळे माझी चिडचिड होत होती”.
यापुढे ती असं म्हणाली की, “काही लोक आपल्यासाठी अंडी घेत होते. त्यामुळे मला तिकडचं वातावरण खराब करायचं नव्हतं. पण मी वेळ आल्याबर बोलेन. छोट्या-छोट्या गोष्टीवर वाद घालायला मला आवडत नाही. कारण माझे छोटे वाद नसतात. तर ते एक मोठं भांडण असतं”. त्यामुळे आता अंकिता व निक्की यांच्यात मतभेद वाढणार का? या मतभेदामुळे त्यांच्याट भांडण होणार का? आणि या सर्वाचा घरावर व घरातील इतर स्पर्धकांवर काय परिणाम होणार? हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.