‘बिग बॉस ओटीटी ३’ हा शो आता अंतिम टप्प्याच्या दिशेने जात आहे. बिग बॉस ओटीटीचा महाअंतिम सोहळा जवळ आला असून घरातील स्पर्धकांमध्ये अंतिम लढतीसाठी चुरस पाहायला मिळत आहे. या घरात आल्याच्या पाहिल्या दिवसापासून् अरमान मालिका व त्याच्या पत्नी चर्चेत आहेत, अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने काही दिवसांपूर्वीच घरातून निरोप घेतला. मात्र तीची दुसरी पत्नी कृतिका व तो या घरात अजूनही आहे. या जोडीच्या अनेक बातम्यांनी सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये धुमाकूळ घातला. तथापि, महाअंतिम सोहळ्याच्या आधी या दोघांना रिॲलिटी चेक दिले आणि त्यांना त्यांच्या बाँडबद्दल काही कठीण प्रश्न विचारले. ज्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुकतंच या घरात मुनव्वर फारुकी आला होता. तेव्हा यात त्याने कृतिका मलिकला जिमचे कपडे परिधान केल्याबद्दल प्रश्न केला. अलीकडेच मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस ओटीटी ३’ शोमध्ये प्रवेश केला. तेव्हा मुनव्वर कृतिकाशी संभाषण करताना दिसला आणि त्याने तिला तिच्या दुटप्पीपणाबद्दल प्रश्न विचारला. मुनव्वरने तिला “जर ती सोशल मीडियावर इतक्या लोकांसमोर स्वत:चे व्हिडीओ शेअर करते मग इथे कोणी तिची स्तुती केली तर ती ओव्हर रिऍक्ट का करते?” असं विचारलं.
आणखी वाचा – नेत्राच्या पोटातून अद्वैतला ऐकू आली विचित्र वीणा व किंचाळी, नेत्रा व बाळ वाचणार का?
मुनव्वर असं म्हणाला की, “तुमचा सोशल मीडियावर एक रील व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात तुम्ही जिमचे घट्ट कपडे परिधान केलेले आहेत. यामुळे तुम्ही सोशल मीडियावर स्वत:ला एक्सपोज करता असे तुम्हाला वाटत नाही का? जे की चुकीचे नाही. पण मग मला असं वाटतं की, तुम्ही सोशल मीडियावर स्वत:ला एक्सपोज करता आणि इथे जर कोणी तुमची स्तुती केली तर त्यात काय अडचण आहे?”.
यापुढे मूनव्वरने अरमान मलिकचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी मुनव्वरने अरमानला पहिली पत्नी पायल मलिकबद्दल विचारले. पायलला माध्यमांनी घटस्फोटाबद्दल विचारले तेव्हा तिने त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. ज्यावर अरमान म्हणाला की, “जो वाईट काळात साथ सोडून गेला नाही तो चांगल्या काळातही सोडून जाणार नाही”.