शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss फेम प्रसिद्ध युट्यूबवर FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, पाठलाग व धमकीचा आरोप

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 25, 2025 | 12:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss OTT 2 winner YouTuber Elvish Yadav Ghaziabad court orders FIR for stalking and threatening

Bigg Boss OTT 2 winner YouTuber Elvish Yadav Ghaziabad court orders FIR for stalking and threatening

प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव हा ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता झाल्यापसून चांगलाच प्रसिद्धी झोतात आला आहे. गेले काही दिवस त्याच्या नावाच्या चांगल्याच चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. आज या कारणामुळे तर उद्या त्या कारणामुळे त्याच्याबद्दलच्या चर्चा या सतत सुरुच असतात. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाझियाबाद कोर्टाने त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. (Elvish Yadav FIR)

मनेका गांधींच्या पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) या एनजीओचे सदस्य सौरभ गुप्ता यांच्या घरात जबरदस्तीने घुसून त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एल्विश यादव आणि त्यांच्या लोकांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सौरभने सांगितले. ‘आज तक’च्या वृत्तानुसार, गाझियाबादमधील नंदग्राम पोलिस स्टेशनमध्ये एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने आता कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)

१० मे २०२४ रोजी, एल्विश यादव आणि त्याच्या साथीदारांनी सौरभ गुप्ताचा पाठलाग केला आणि नंतर १.३० वाजता राज नगर एक्स्टेंशनमधील गौर कॅस्केड्स येथे असलेल्या सोसायटीमध्ये प्रवेश केला. सुमारे १० मिनिटे ते त्यांच्या एसयूव्हीमध्ये सोसायटीच्या पार्किंग परिसरात फिरले आणि नंतर तेथून निघून गेले. सौरभला संशय आहे की, त्याच्या सोसायटीतील कोणीतरी एल्विश यादव आणि त्याच्या साथीदारांना सोसायटीत येण्यास मदत केली.

आणखी वाचा – महाराष्ट्र सरकार शाहरुख खानला देणार तब्बल नऊ कोटी रुपये, ‘मन्नत’साठी गौरीने केली होती याचिका, नेमकं प्रकरण काय?

गुन्हा दाखल झाल्यापासून एल्विश आणि त्याचे साथीदार सोशल मीडियावर त्याला आणि त्याच्या भावाला धमकावत असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. एल्विश तुरुंगात गेल्यापासून सौरभ गुप्ता आणि त्याच्या भावाला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत धमक्या येत आहेत. यामुळे काही महिन्यांपूर्वी त्याला त्याचे फेसबुक अकाउंट डिलीट करावे लागले होते.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने घेतला संन्यास, महाकुंभात पार पडला दीक्षा समारंभ, स्वतःचं नावही बदललं अन्…

दरम्यान, एल्विशच्या नावाने खाते चालवणाऱ्या त्याच्या साथीदारांनी सौरभ गुप्ता आणि त्याच्या भावाला धमकावणे, त्यांच्या छायाचित्रांसह बनावट व्हिडीओ आणि बातम्या पोस्ट करणे सुरु ठेवले. एल्विशने एक व्हिडीओही केला होता आणि सौरभ गुप्ताचे घरातून अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यांतर सौरभने गाझियाबादमधील नंदग्राम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता न्यायालयाने एल्विशच्या अटकेचे आदेश दिले आहेत.

Tags: elvish yadavElvish Yadav FIRElvish Yadav Ghaziabad court orders FIR
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
krushna abhishek on aarti singh

आठ वर्षापर्यंत बहीण असल्याची कृष्णा अभिषेकला नव्हती कल्पना, 'तो' प्रसंग सांगताना म्हणाला, “आम्ही भेटलो तेव्हा…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.