टेलिव्हिजन अभिनेता कृष्णा अभिषेक हा नेहमी चर्चेत राहणारा अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मालिका, कार्यक्रम व चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळते. खासकरुन त्याच्या विनोदी व्यक्तीरेखा चाहत्यांच्या खूप पसंतीस पडतात. अनेकदा तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आलेला बघायला मिळतो. बॉलिवूड अभिनेता गोविंदाबरोबर असलेले त्याचे नाते अधिक चर्चेत राहिले आहे. तसेच टेलिव्हीजन अभिनेत्री आरती सिंहबरोबरचे नातंदेखील चर्चेत राहिले आहे. आरती व कृष्णा हे नात्याने भाऊ-बहीण आहेत. आरतीच्या लग्नाच्या वेळी तो अधिक चर्चेत आला होता. बहिणीच्या लग्नामध्ये त्याने भावाची सगळी कर्तव्य पार पाडली होती. (krushna abhishek on aarti singh)
आरतीबरोबरच्या नात्याबद्दल कृष्णाने नुकताच एक खुलासा केला आहे. आरतीच्या जन्माच्या सात ते आठ वर्षानंतर बहीण असल्याचे त्याला माहीत असल्याचे सांगितले. कृष्णाने लहानपणीच्या सर्व आठवणींना उजाळा दिला आहे. अर्चना पूरण सिंह यांच्या एका व्लॉगमध्ये कृष्णाने लहान बहिणीला भेटल्याच्या आठवणीबद्दल सांगितले आहे. आरतीच्या जन्मानंतर काही दिवसांतच तिच्या आईचे निधन झाले. त्यावेळी गोविंदाची वहिनी आरतीला लखनऊला घेऊन गेली. तो म्हणाला की, “मी जेव्हा आरतीला भेटलो तेव्हा ती फक्त पाच-सहा वर्षाची होती. तोपर्यंत मला बहीण आहे असं काहीच माहीत नव्हतं. त्यावेळी आम्ही पहिल्यांदा भेटलो. तेव्हापासूनच आमचं नातं खूप घट्ट झालं”.
दरम्यान टेलिव्हीजन क्षेत्रात दोघं भाऊ-बहीण कार्यरत आहेत. कृष्णाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ‘कॉमेडी सर्कस’, ‘द कपिल शर्मा शो’, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ अशा अनेक कार्यक्रमांमध्ये दिसून आला आहे. तसेच ‘बोल बच्चन’, ‘एंटरटेनमेंट’ अशा चित्रपटांमध्येही दिसून आला आहे. तसेच आरतीदेखील टेलिव्हीजनवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
आणखी वाचा – Bigg Boss फेम प्रसिद्ध युट्यूबवर FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, पाठलाग व धमकीचा आरोप
आजवर आरतीने ‘परिचय’, ‘उतरन’, ‘बिग बॉस १३’ अशा अनेक कार्यक्रमांमध्ये दिसून आली आहे. कृष्णा व आरती दोघंही त्यांच्या कामामध्ये पारंगत आहेत. आरतीच्या लग्नामध्ये गोविंदा, आरती व कृष्णा यांना एकत्रित पाहिले होते. यावेळीच गोविंदा व कृष्णा यांच्यामधील अनेक वर्षांपासून असलेले वाद मिटले होते.