Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ या रिऍलिटी शोने साऱ्यांना अक्षरशः वेड लावलं. अल्पावधीतच हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागला. तसेच एकामागोमाग एक स्पर्धक घराबाहेर जाताच चाहत्यांमध्येही नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला. अशातच ‘बिग बॉस’ने शो सुरु असताना आठवड्याच्या मध्येच एलिमिनेशन टास्क घेतला. यावेळी त्यांनी घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचं नाव सांगितलं, ते ऐकून ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांना धक्का बसला. फिनालेच्या ५ दिवस आधी अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैनला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
जनतेची कमी मते मिळाल्याने विकी जैन या खेळातून बाद झाला. दरम्यान विकीच्या एलिमिनेशननंतर अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार व अरुण श्रीकांत माशेट्टी या सीझनचे टॉप ५ स्पर्धक आहेत. विकी घराबाहेर पडल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. विकी घराबाहेर गेल्यामुळे त्याची पत्नी अंकिता लोखंडेला अश्रू अनावर झाले. अंकिता विकीला मिठी मारत ढसाढसा रडली, ती ‘बिग बॉस’च्या घरातून तिच्या नवऱ्याला जाऊच देत नव्हती. तिने त्याला मिठी मारली आणि तिला त्याचा खूप अभिमान असल्याचेही तिने सांगितले.

अशातच मराठी ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर याने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षयने विकी जैनसाठी एक खास पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळत आहे. “तू मला खूप आवडतोस, खूप चांगला खेळ खेळला आहेस” असं म्हणत त्याने विकीच्या खेळाचं कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे. यावरुन ”बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर विकी जैनचा चाहता असल्याचं समोर आलं. विकी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर जाण्यामुळे अक्षयला ही दुःख झालं आहे.
‘बिग बॉस’च्या घरातील विकी जैनचा खेळ संपल्यामुळे सध्या साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून सर्वत्र नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे विकी टॉप ५ स्पर्धकांमध्ये असायला हवा होता असं बोललं जात आहे.