ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला हजेरी लावली होती. रामलल्लाच्या राज्याभिषेकानंतर बरीच कलाकार मंडळी परतीच्या प्रवासाला लागली. पण अनुपम खेर मात्र तिथेच राहिले. दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा सामान्य लोकांमध्ये तोंड लपवत राम मंदिराला भेट दिली. त्याने स्वतः त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि यावेळी आलेल्या अनुभवाबाबत भाष्यही केलं आहे. अनुपम खेर यांनी राम मंदिराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मंगळवारी रामलल्लाच्या मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत अनुपम खेर यांचाही समावेश होता. त्यांना कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी आपला चेहरा लपवला, पण त्यांच्या हा प्रयत्न फसला असल्याचं समोर आलं. (Anupam Kher On Ram Mandir)
व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कृपया शेवटपर्यंत हा व्हिडीओ पाहा. काल मी आमंत्रित पाहुणे म्हणून राम मंदिरात गेलो होतो. पण आज सगळ्यांसह शांतपणे मंदिरात जावंसं वाटलं. यावेळी मी असा भक्तीचा सागर पाहिला की माझे हृदय फुलून आले. रामजींच्या दर्शनासाठी लोकांचा उत्साह व भक्ती जवळून पाहता आली. मी निघत होतो तेव्हा एका भक्ताने माझ्या कानात सांगितलं की, “भाऊ, तोंड झाकून काही होणार नाही. रामलल्लाने तुम्हाला ओळखले आहे. जय श्री राम”.
कृपया अंत तक देखे: कल मैं आमंत्रित अतिथि बनकर राम मंदिर गया था! पर आज सबके साथ चुपचाप मंदिर जाने का मन किया।भक्ति का ऐसा समंदर देखने को मिला कि हृदय गद गद हो उठा।लोगों का राम जी को देखने का उत्साह और भक्तिभाव देखते ही बन रहा था।जब मैं निकलने लगा तो एक भक्त हल्के से कान में बोला,… pic.twitter.com/S0O5X3TVSk
— Anupam Kher (@AnupamPKher) January 23, 2024
अनुपम खेर यांनी काल रामलल्लाच्या राज्याभिषेकानंतर आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये हेलिकॉप्टरमधून राम मंदिर व भक्तांवर फुलांचा वर्षाव केला जात होता. त्यांनी सांगितले की, हे दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. हा व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात खूप भावनिक दृश्ये पाहिली आहेत. अनेक प्रसंगी माझ्या डोळ्यात अश्रू आले आहेत. पण आज जेव्हा #IndianAirforce च्या हेलिकॉप्टरने राम मंदिरावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला तेव्हा माझ्या अश्रूंचा बांध फुटला. कदाचित रामजींबद्दल अनेक वर्षांच्या भावना पूर्ण ताकदीने बाहेर आल्या असतील. व्हिडीओ शूट करताना मी रडत होतो आणि हसत होतो. कदाचित ही रामजींची जादू असावी. जय श्री राम” असं त्यांनी कॅप्शन देत म्हटलं.
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रजनीकांत, धनुष, माधुरी दीक्षित, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी राम लल्लाच्या प्रतिष्ठापनेला हजेरी लावली होती.