शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सूरज टॉप ५ मध्ये असणार?, Bigg Boss Marathi चे काम पाहणाऱ्या केदार शिंदेंचं भाष्य, म्हणाले, “वोट्स येत आहेत ते पाहून…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 20, 2024 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Suraj Chavan will be in the top 5 Colors Marathi programming head Kedar Shinde talked about that know the reason

Bigg Boss Marathi च्या टॉप ५ मध्ये सूरज चव्हाण असणार?, केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा नवीन म्हणजेच यंदाचा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासूनच कायम चर्चेत आहे. या शोमध्ये यावेळी खूप नवनवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. यंदाचा ‘बिग बॉस मराठी’ हा २०२४ चा आहे, त्यामुळे घरातील स्पर्धकही नव्या दमाचे घेतले असं कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा नेत्या, अभिनेत्यांपासून गायक व सोशल मीडिया इन्फ्ल्युसर्स अशा प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धकांचा समावेश आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये सूरज, अंकिता, डीपी या सोशल मीडिया इन्फ्ल्युसर्सनी सहभाग घेतला आहे, तर निक्की, जान्हवी, पॅडी व वर्षा यांसारखे अभिनेते, अभिनेत्रीही सहभागी झाले आहेत.(Kedar Shinde On Suraj Chavan)

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला सुरुवात होऊन आता जवळपास पन्नास दिवस झाले आहेत. त्यामुळे या घरातील स्पर्धकांमध्ये आता चुरुशीची लढत पाहायला मिळत आहे.  या घरातील सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणचा साधेपणा लोकांना भावतो आहे. त्याच्या प्रत्येक कृतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये आनंदी भावना पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्या चाहते मंडळींसह प्रेक्षकांनाही तो या शोचा विजेता व्हावा अशी इच्छा आहे. अनेकजण तो हा शो जिंकावा अशा प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’चे काम जवळून पाहणारे व कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनीदेखील तो टॉप ५ मध्ये येईल असं म्हटलं आहे.     

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Himesh Reshammiya Father Death : प्रसिद्ध गायक, संगीतकार हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केदार शिंदे यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या कॅचअपमध्ये मुलाखत दिली. यावेळी केदार शिंदे यांना “टॉप ५ मध्ये कोण येईल?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत केदार शिंदे यांनी असं म्हटलं की, “मला नाही माहिती. या प्रश्नाचे उत्तर देणं फार कठीण आहे. कारण दर आठवड्याला गेम ज्या पद्धतीने फिरत आहे. त्या पद्धतीने ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांमध्ये उत्सुकता आहे आणि ‘बिग बॉस’च्या घराबाहेरील प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. या घरातील प्रत्येकजण हा जिंकायलाच आला आहे. त्यामुळे कुणीही शस्त्र टाकून घरी येणार नाही. प्रत्येक जण लढेल. पण आता शेवटी टॉप ५ मध्ये कोण येईल हे मलाही माहित नाही”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात अरबाज पुन्हा एकदा आक्रमक, स्वत:वर राग व्यक्त केला अन्…; निक्कीवरही चिडला, नेमकं काय झालं?

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “जनतेचा रेटा जो दिसत आहे, त्यानुसार सूरज शेवटच्या टॉप ५ मध्ये असेल असं मला वाटत आहे. जे काय वोट्स येत आहेत ते जगजाहीर आहे. त्याबद्दल सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे सूरज असायला पाहिजे”.  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजने अनेकदा केलेल्या साध्या सोप्या कृतीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुरुवातीलाअ त्याला बिग बॉसचा गेम कळत नव्हता पण आता त्याला हा खेळ कळायला लागला असून प्रत्येक टास्कमध्ये तो आपला जीव लावून खेळत आहे.   

Tags: bigg boss marathi 5kedar shindeSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Suraj Chavan and DP aka Dhananjay Powar argument Ankita Walawalkar will settle the matter

Bigg Boss Marathi : सूरजचं डीपी दादाला उलट उत्तर, अंकिताची मध्यस्थी, म्हणाली, "त्यांना असं बोलू नको कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.