शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Himesh Reshammiya Father Death : प्रसिद्ध गायक, संगीतकार हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 19, 2024 | 9:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood singer and music composer Himesh Reshammiya father Vipin passed away

गायक, संगीतकार हिमेश रेशमियाला पितृशोक, वृद्धपकाळामुळे झाले निधन

बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमिया याचे वडील आणि प्रसिद्ध संगीतकार विपिन रेशमिया यांचे निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विपिन रेशमिया यांच्या धीरूभाई रुग्णालयात उपचार सुरू होते. वाढतं वय आणि आजारपणाशी ते गेल्या काही काळापासून झुंजत होते. अखेर बुधवारी त्यांचं निधन झालं. वडिलांच्या जाण्यामुळे हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला असून बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त होत आहे. तसंच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. (Hiemsh Reshmiya Father Death)

काही वृत्तांनुसार, त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. हिमेश रेशमियाच्या कुटुंबातील एका व्यक्तीने विपिन यांच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली आहे. हिमेश रेशमियाच्या वडिलांवर आज म्हणजेच गुरुवार १९ सप्टेंबर रोजी जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फॅशन डिझायनर वनिता थापर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी सकाळी विपिन रेशमियाचा मृतदेह आधी घरी आणला जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचे अत्यंदर्शन होणार आहे अशी माहिती वनिता यांनी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh)

विपिन हे हिमेशचे वडीलच नव्हते तर त्याचे गुरुही होते’, असे खुद्द हिमेशने एका मुलाखतीत सांगितले होते. याबद्दल हिमेश रेशमिया म्हणाला होता की, “माझे वडील, माझा देव माझे गुरू आहेत. माझ्या वडिलांनी मला जे शिकवले त्याचे प्रतिबिंब म्हणजे माझे संगीत आहे”. त्यामुळे आता वडिलांच्या निधनानंतर हिमेश रेशमियाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे.

आणखी वाचा – 19 September Horoscope : कन्या, तूळ, मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस आनंदाचा, इतर राशींसाठी दिवस कसा? जाणून घ्या…

सलमान खानच्या चित्रपटातही विपिन रेशमिया यांनी संगीत दिले आहे. यादरम्यान त्यांची भेट हिमेश रेशमियाशी झाली. यानंतर सलमानने हिमेश रेशमियाला त्याच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटासाठी संधी दिली. नंतर ‘इंडियन आयडॉल १२’च्या दरम्यान आपल्या वडिलांबद्दल बोलत असताना हिमेश रेशमिया म्हणाला होता की, त्यांनी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्याबरोबरही एक गाणे तयार केले होते, जे कधीही रिलीज झाले नाही.

आणखी वाचा – “मी मेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला, “मानसिकरित्या खचतो…”

दरम्यान, विपिन रेशमिया यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, विपिन रेशमिया यांनी द एक्सपोज (२०१४) आणि तेरा सुरूर (२०१६) ची निर्मिती केली होती. विपिन यांनी इन्साफ का सूरज (१९९०) नावाच्या रिलीज न झालेल्या चित्रपटासाठी संगीत दिले आहे.

Tags: Himesh Reshammiya fatherHimesh Reshammiya father Vipin Reshammiya Himesh Reshammiya father passed awaymesh Reshammiya father passed away newsVipin Reshammiya death news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo Arbaz Patel once again offensive and expressed his anger on Nikki Tamboli.

Bigg Boss Marathi च्या घरात अरबाज पुन्हा एकदा आक्रमक, स्वत:वर राग व्यक्त केला अन्...; निक्कीवरही चिडला, नेमकं काय झालं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.