सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : सूरजचं डीपी दादाला उलट उत्तर, अंकिताची मध्यस्थी, म्हणाली, “त्यांना असं बोलू नको कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 19, 2024 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Suraj Chavan and DP aka Dhananjay Powar argument Ankita Walawalkar will settle the matter

Bigg Boss Marathi 5 च्या घरात सूरज-डीपी यांच्यात बाचाबाची, अंकिता मध्यस्थी करत काढणार समजूत

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता आठवा आठवडा सुरू झाला आहे. या आठव्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्कही सुरू झाला आहे. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना कॅप्टन्सीचा टास्क दिला आहे. घरात स्पर्धकांना राहून आता जवळपास ५० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे घरातील स्पर्धकांमध्ये घरात टिकून राहण्यासाठी व अंतिम सोहळ्यापर्यंत टिकून राहण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशातच या घरातील नात्यांची समीकरणेही बदलतानाचे पाहायला मिळत आहे. घरात सुरुवातीला मित्र असणारे आता एकमेकांच्या विरोधात उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाण हा अतिशय स्ट्रॉंग प्लेअर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला टास्क कळायला वेळ लागत असला तरी तो टास्क पूर्ण ताकदीने खेळतो. घरातील टास्कबद्दल अंकिता व पॅडी त्याला वेळोवेळी समजावत असतात. अशातच आता घरात सूरज व डीपी यांच्यात काही कारणावरुन बाचाबाची झाली असून त्यांच्यात झालेल्या या बाचाबाचीमध्ये अंकिता मध्यस्थी करणार आहे, बिग बॉस मराठीचा एक नवीन व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे, ज्यात अंकिता सूरजची समजूत काढत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

यावेळी अंकिता सूरजला समजावत म्हणाली की, “तू असं कसं म्हणालास त्यांना की मला सांगू नका माझं काय करायचं ते… असं बोलणं चांगलं आहे का? असं नाही बोलायचं…” यावर सूरज असं म्हणतो की, “मी माझं सांगितलं. मी बोलत असताना ते मध्ये बोलले म्हणून मी बोललो. नाही तर मी असं मध्ये कुणाला काही बोलत नाही”. यानंतर अंकिता पुन्हा त्याची समजूत काढत त्याला सांगते की, “त्यांनी तुला चांगल्यासाठीचं सांगितलं ना? काहीतरी आपण कामाचं करत आहोत”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात अरबाज पुन्हा एकदा आक्रमक, स्वत:वर राग व्यक्त केला अन्…; निक्कीवरही चिडला, नेमकं काय झालं?

यापुढे सूरजही त्याची बाजू मांडत असं म्हणाला की, “कामाचं बोलले हे मला माहीत आहे. पण डीपीदादा मध्ये बोलले म्हणून मी बोललो, नाहीतर मला मध्ये मध्ये करायची काही गरज नाही. मी माझं माझं असंच काहीतरी डायलॉग बोलत असताना ते मध्येच बोलले आणि हसायला लागले. म्हणून मी बोललो”. त्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अंकिता पुन्हा त्याला असं म्हणते की, “आपण मोबाईलवर वगैरे जे करतो ते वेगळं असतं आणि इथे वेगळं असतं. त्यामुळे जे काय ते नीट सांगायचं”.

आणखी वाचा – सूरज टॉप ५ मध्ये असणार?, Bigg Boss Marathi चे काम पाहणाऱ्या केदार शिंदेंचं भाष्य, म्हणाले, “वॉट्स येत आहेत ते पाहून…”

दरम्यान, बुधवारी झालेल्या कॅप्टन्सीच्या शर्यतीमधून पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी व अंकिता वालावलकर हे दोघे बाहेर पडले आहेत. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना कॅप्टन्सीचा टास्क दिला आहे. त्यानुसार, घरातील सदस्यांना अंडे मिळवून कॅप्टन पदाच्या शर्यतीत नको असणार्‍या सदस्याच्या नावाने घरट्यात अंडे टाकायचे आहे. या फेरीत अरबाज अगदी सहजपणे जान्हवी, संग्रामला अडवतो आणि यामुळे निक्की अंडी उचलून अंकिता व पंढरीनाथ यांच्या घरट्यात टाकते. यामुळे हे दोघंही कॅप्टन्सी कार्यातून बाद होतात. 

Tags: ankita walawalkarDP aka Dhananjay PowarSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
sana khan on career

वाईट शक्तीमुळे अभिनय क्षेत्रात आल्याचा सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, मुस्लिम मुलाशी लग्न केल्यानंतर म्हणाली, "अल्लाहने मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.