Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची सर्वत्र अधिक चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. यंदाचं हे ‘बिग बॉस मराठी’चं पर्व विशेष चर्चेत आलेलं आलं. घरातील सर्वच स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडे केलेले पाहायला मिळाले. ७० दिवस प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केल्यावर हे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा महाअंतिम सोहळा अगदी दिमाखात पार पडणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आता सहा स्पर्धक उरले आहेत. आणि यंदाच्या पर्वाचे हे टॉप सहा फायनलिस्ट ठरले आहेत. तत्पूर्वी शोमधील टॉप ६ पैकी आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार असल्याचं समोर येत साऱ्यांना धक्का बसला आहे.
अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर व अंकिता प्रभू वालावलकर हे ‘बिग बॉस’मधील सहा फायनलिस्ट आहेत. यांच्यापैकी एक जण आज घराबाहेर जाणार असल्याचं प्रोमोवरुन समोर आलं आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्यांना गार्डन एरियात उभं करुन ‘बिग बॉस’ शोमधील ट्विस्टबद्दल सांगतात. “बिग बॉस मराठीच्या या पर्वातील टॉप ६ फायनलिस्ट मी जाहीर केले आणि इथेच येतो आहे ट्विस्ट. आता आपल्याला कळेल टॉप ५” अशी घोषणा बिग बॉस”, अशी घोषणा करत ‘बिग बॉस स्पर्धकांना धक्का देतात.
आणखी वाचा – इतक्या सुंदर व गोंडस दिसतायत रुबिना दिलैकच्या जुळ्या मुली, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, नावंही आहेत खूप खास
नुकत्याच झालेल्या मिड एव्हिक्शनमध्ये वर्षा उसगांवकर यांना घराबाहेर पडावं लागलं. त्यामुळे उर्वरित सहा सदस्य आता ‘बिग बॉस’चे सहा फायनलिस्ट ठरले. आता या सहा स्पर्धकांमध्ये होणाऱ्या नॉमिनेशमध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी हे स्पर्धक डेंजर झोनमध्ये नाही आहेत. तर जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार या स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे.
सदर प्रोमो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रोमोखाली कमेंट करायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस’ची घोषणा झाल्यावर निक्की व अंकिता यांची ओव्हरऍक्टिंग अनेकांना खटकली. तर काहींनी आज घराबाहेर कोण जाणार याचा अंदाज वर्तवलेला पाहायला मिळत आहे. “जान्हवी ला बाहेर काढा”, “ओव्हर ॲक्टिंगच्या मानकरी जान्हवी किल्लेकर घराबाहेर”, “जान्हवी बाहेर जाणार आता”, “गुड बाय जान्हवी”, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या पाहायला मिळत आहेत.