Bigg Boss Marathi season 5 : सध्या ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरु आहे. आता सर्वत्र या शोची चर्चा सुरु आहे. यावेळी मालिका, सोशल मीडिया अशा क्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी झालेले आहेत. दर शनिवारी या कार्यक्रमामध्ये भाऊचा धक्का हा विशेष कार्यक्रम असतो. यामध्ये कोणाची काही चूक असेल किंवा कोणी काही केलं असेल तर त्याबद्दल प्रश्न-उत्तरे विचारली जातात. मागील शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुखने निक्की तांबोळीची शाळा घेतली होती. तसेच इतर स्पर्धकांनादेखील सुनावले होते. आता पुन्हा एकदा स्पर्धकांनी अशा काही चुका केल्या आहेत ज्यासाठी पुन्हा एकदा रितेश त्यांची शाळा घेताना दिसणार आहे.
‘बिग बॉस…’मध्ये यावेळी दुसरा भाऊचा धक्का पार पडणार आहे. यामध्ये रितेश जान्हवी किल्लेकरची बोलती बंद करताना दिसणार आहे. दुसऱ्या आठवड्यात जान्हवीचे वागणं अनेकांना पटलं नसल्याचंही समोर आलं आहे. जान्हवीने वर्षा यांच्याशी बोलताना अपमानस्पद शब्द वापरले. तसेच त्यांना पुरस्कारावरुनही सुनावले. तसेच जान्हवीने अभिजीतला देखील ‘बांगड्या घाल’ असे शब्द वापरले त्यामुळे सगळ्यांनाच जान्हवीचा खूप राग आला आहे. यामध्ये रितेश तिला म्हणाला की, “प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बांगड्यांचं खूप महत्त्व आहे. बांगड्या हे सौंदर्याचं प्रतिक आहे”. हे बोलत रितेशने जान्हवीची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
दरम्यान आता रितेशचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ‘बिग…’ च्या चाहत्यांनी व नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच रितेशचे देखील कौतुक केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने म्हंटले की, “आज मी शांततेत झोपू शकेन”, दुसऱ्या एका नेटकाऱ्याने लिहिले की, “आज कोणा-कोणाच्या मनाला शांती मिळाली आहे?”, तसेच अजून एका नेटकाऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “आली रे आली आता जान्हवीची बारी आली. निक्कीला कॉपी करत होतीस ना. भोग आता कर्माची फळं”.
पुढे एका नेटकाऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “खूप आनंद झाला रितेश दादा. खूप भारी वाटलं”. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमधून आता सगळ्यांनीच रितेशचे कौतुक केले आहे. तसेच जान्हवीला सुनावलयाने सगळ्यांनाच आनंद झाला आहे. त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यावर अजून काय होणार? हे आता पाहाण्यासारखे आहे. +