शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जान्हवी किल्लेकर पैसे घेऊन बाहेर येणं लेकाला पटलंच नाही, निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं, म्हणाला, “तू थोडं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 7, 2024 | 4:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale  jahnavi killekar

कुटुंबीयांबाबत 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरचं भाष्य

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale  : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष गाजलं. यंदाचं हे पर्व १०० दिवसांचं नसून ७० दिवसांचं होतं. ‘बिग बॉस’च्या घरात सदस्यांनी हे ७० दिवस विशेष धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने नाव कोरले तर अभिजीत सावंत हा रनर अप ठरला. टॉप ६ सदस्यांपैकी जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये रोख रक्कम घेऊन हा खेळ सोडला. खेळ सोडल्यानंतर जान्हवीने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं समोर आलं. कारण मतांनुसार जान्हवी किल्लेकर सहाव्या स्थानावर होती. त्यामुळे जर तिने खेळ सोडला नसता तर ती एलिमिनेट झाली असती आणि तिला पैसे मिळाले नसते.

जान्हवीचा हा निर्णय योग्य होता की अयोग्य याबाबत भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने तिच्या मुलाला म्हणजेच ईशान किल्लेकरला विचारलं असता, याचं उत्तर देत ईशान म्हणाला, “थोडं बरोबर केलं”. यावरुन जान्हवीचा हा निर्णय तिच्या लेकाला पटला नसल्याचं दिसलं. तर जान्हवीने ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकावी अशी तिच्या मुलाची इच्छा होती. आईला ट्रॉफी न घेऊन बाहेर आलेलं पाहून तो थोडासा नाराज असलेला दिसला.

आणखी वाचा – Video : जान्हवी किल्लेकर घरी पोहोचताच जंगी स्वागत, नवरा-जाऊबाई घराबाहेरच बेभान होऊन नाचले अन्…; व्हिडीओ व्हायरल

तर ‘बिग बॉस मराठी’मधून घरी परतल्यानंतर जान्हवीचं तिच्या घरी अगदी धुमधडाक्यात स्वागत करण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी ढोल ताशाच्या गजरात तिचं स्वागत केलेलं पाहायला मिळालं. जान्हवीच्या सासूबाईंचाही तिला खूप पाठिंबा असलेला पाहायला मिळाला. सासूबाईंचा प्रतिक्रियेबाबत ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने भाष्य केलं आहे. जान्हवी म्हणाली, “मी खूप खुश होते. माझ्या आईने म्हणजेच माझ्या सासूबाई कॅमेरासमोर माझ्याबद्दल ज्या काही बोलल्या ते पाहून मला खूप रडू आलं. ज्या कधी फोटो काढायला, पण तयार नसतात. फोटोमध्ये कधी स्माईल करायला सांगितलं तरी, त्या आहे तशाच उभ्या असतात. ज्या फोटोसाठी कधी उभ्या नसतात त्यांनी माझ्याबद्दल इतकं बोललं हे पाहून मला असं झालं जान्हवी तू जिंकलीस”.

आणखी वाचा – “मला ट्रॉफी हवी होती कारण…”, अभिजीत सावंतचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “सूरजसाठी खुश आहे पण…”

‘बिग बॉस मराठी’मधून जान्हवीने नुसतीच एक्झिट न घेता तब्बल नऊ लाख रुपये इतकी प्राइज मनी घेत ती घराबाहेर पडली असल्याचे दिसलं. सर्व सदस्यांपुढे एक मोठा ट्विस्ट ठेवण्यात आला होता की नऊ लाख रुपयांनी भरलेली ही बॅग घेऊन घरी जायचं आहे. यावेळी जान्हवीने पुढाकार घेतला आणि जान्हवी घराबाहेर पडली.

Tags: Bigg Boss Marathi Season 5 Grand Finalejahnavi killekarjahnavi killekar family
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 grand finale Konkan Hearted Girl Ankita Walawalkar talked about Suraj Chavan.

"त्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान नाही आणि…", सूरज चव्हाणबाबत अंकिता वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली, "त्याची कुवत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.