Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ हे पर्व विशेष गाजताना दिसलं. या पर्वाने विशेष धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या पर्वात विविध कलाक्षेत्रातील कलाकार मंडळींना उत्तम असा प्लॅटफॉर्मही मिळालेला पाहायला मिळाला. नुकताच ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ चा महाअंतिम सोहळा अगदी दणक्यात पार पडला. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या विजेतेपदावर गुलीगत फेम सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. ही यंदाची मानाची ट्रॉफी सूरज चव्हाणने पटकावली तर रनर अप म्हणून अभिजीत सावंत विजेता ठरला. तब्बल सहा फायनलिस्ट मधून ही विजेत्यांची लिस्ट समोर आलेली पाहायला मिळाली.
यंदाचा हे एलिमिनेशन खूपच रंजक पद्धतीने झालेलं पाहायला मिळालं. दरम्यान, अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची एक्झिट ही रंजक होती. कारण जान्हवीने नुसतीच एक्झिट न घेता तब्बल नऊ लाख रुपये इतकी प्राइज मनी घेत ती घराबाहेर पडली असल्याचे दिसलं. सर्व सदस्यांपुढे एक मोठा ट्विस्ट ठेवण्यात आला होता की नऊ लाख रुपयांनी भरलेली ही बॅग घेऊन घरी जायचं आहे. यावेळी जान्हवीने पुढाकार घेतला आणि जान्हवी घराबाहेर पडली. घरी आल्यानंतर जान्हवीचं जोरदार स्वागत होतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. तिच्या कुटुंबीयांनी ढोल ताशाच्या गजरात तिचं स्वागत केलेलं पाहायला मिळालं.
सगळेच कुटुंबीय जान्हवीसह बेधुंद होऊन फिरतानाही दिसले. इतकंच नव्हे तर घरात येताच तिचं औक्षण केलं आणि तिची नजर काढण्यात आली. त्यानंतर घरात येताच तिचं वेलकम किलर गर्ल असं म्हणत सर्वांनी स्वागत केलं. एकूणच जान्हवीचं तिच्या घरी कुटुंबियांकडून भरभरुन स्वागत होताना पाहायला मिळालं. घरी आल्यानंतर जान्हवीने सर्वात आधी देवघरात जात देवा समोर नमस्कार केला त्यानंतर तिने बाबांसमोरही हात जोडत नमस्कार केलेला पाहायला मिळाला. एकूणच तिचा हा प्रवास फारच रंजक होता.
घरी आल्यानंतर घरातल्या कुटुंबीयांसह ती वेळ घालवताना दिसली. शिवाय केक कट करुन झाल्यानंतर तिने तिचे तिचे पती किरण किल्लेकर आणि मुलगा ईशानलाही तो भरवला आणि यावेळी सगळेजण खूप खुश असल्याचं दिसलं. जान्हवीच्या घरी धुमधडाक्यात झालेलं तिचं हे स्वागत सर्वत्र चर्चेत आलं आहे. “नऊ लाखांची मालकीन योग्य निर्णय घेतला”, “जान्हवी भारी खेळली”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी जान्हवीच कौतुक केलं आहे.