Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष गाजलं. यंदाचं हे पर्व १०० दिवसांचं नसून ७० दिवसांचं होतं. ‘बिग बॉस’च्या घरात सदस्यांनी हे ७० दिवस विशेष धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने नाव कोरले तर अभिजीत सावंत हा रनर अप ठरला. टॉप ६ सदस्यांपैकी जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये रोख रक्कम घेऊन हा खेळ सोडला. खेळ सोडल्यानंतर जान्हवीने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं समोर आलं. कारण मतांनुसार जान्हवी किल्लेकर सहाव्या स्थानावर होती. त्यामुळे जर तिने खेळ सोडला नसता तर ती एलिमिनेट झाली असती आणि तिला पैसे मिळाले नसते.
जान्हवीचा हा निर्णय योग्य होता की अयोग्य याबाबत भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने तिच्या मुलाला म्हणजेच ईशान किल्लेकरला विचारलं असता, याचं उत्तर देत ईशान म्हणाला, “थोडं बरोबर केलं”. यावरुन जान्हवीचा हा निर्णय तिच्या लेकाला पटला नसल्याचं दिसलं. तर जान्हवीने ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकावी अशी तिच्या मुलाची इच्छा होती. आईला ट्रॉफी न घेऊन बाहेर आलेलं पाहून तो थोडासा नाराज असलेला दिसला.
तर ‘बिग बॉस मराठी’मधून घरी परतल्यानंतर जान्हवीचं तिच्या घरी अगदी धुमधडाक्यात स्वागत करण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी ढोल ताशाच्या गजरात तिचं स्वागत केलेलं पाहायला मिळालं. जान्हवीच्या सासूबाईंचाही तिला खूप पाठिंबा असलेला पाहायला मिळाला. सासूबाईंचा प्रतिक्रियेबाबत ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने भाष्य केलं आहे. जान्हवी म्हणाली, “मी खूप खुश होते. माझ्या आईने म्हणजेच माझ्या सासूबाई कॅमेरासमोर माझ्याबद्दल ज्या काही बोलल्या ते पाहून मला खूप रडू आलं. ज्या कधी फोटो काढायला, पण तयार नसतात. फोटोमध्ये कधी स्माईल करायला सांगितलं तरी, त्या आहे तशाच उभ्या असतात. ज्या फोटोसाठी कधी उभ्या नसतात त्यांनी माझ्याबद्दल इतकं बोललं हे पाहून मला असं झालं जान्हवी तू जिंकलीस”.
आणखी वाचा – “मला ट्रॉफी हवी होती कारण…”, अभिजीत सावंतचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “सूरजसाठी खुश आहे पण…”
‘बिग बॉस मराठी’मधून जान्हवीने नुसतीच एक्झिट न घेता तब्बल नऊ लाख रुपये इतकी प्राइज मनी घेत ती घराबाहेर पडली असल्याचे दिसलं. सर्व सदस्यांपुढे एक मोठा ट्विस्ट ठेवण्यात आला होता की नऊ लाख रुपयांनी भरलेली ही बॅग घेऊन घरी जायचं आहे. यावेळी जान्हवीने पुढाकार घेतला आणि जान्हवी घराबाहेर पडली.