Bigg Boss Marathi 5 : कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकरच्या ‘बिग बॉस मराठी’मधील एन्ट्रीमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. सुरुवातीला अंकिताला खेळाचा अंदाज आला नसल्याचंही पाहायला मिळालं. पण त्यानंतर जसा तिला खेळ समजला तसं तिने ‘बिग बॉस’च्या घरातलं तिचं स्थान भक्कम केलं. पण अखेर ग्रँड फिनालेमध्ये येऊन अखेरला तिचा या घरातील प्रवास आता संपला. अंकिता ही टॉप ६ मध्ये जाणारी शेवटची स्पर्धक होती. वर्षा उसगांवकर आणि अंकितामध्ये ग्रँड फिनालेची शर्यत रंगली होती. पण आता ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन तिचा हा प्रवास आता संपला. (Bigg Boss Marathi 5 Ankita Walawalkar)
त्यानंतर घरात अंकिता, धनंजय, निक्की, जान्हवी, सूरज व अभिजीत या सहा जणांमध्ये अंतिम लढत झाली आणि या लढतीत एकेक जण बाहेर पडत टॉप २ मध्ये सूरज व अभिजीत यांनी स्थान मिळवले. सूरज व अभिजीत या दोघांमध्ये अखेर सूरजने विजेतेपद पटकावले. ‘बिग बॉस’च्या घरात सूरज, अंकिता आणि पॅडी यांची चांगली मैत्री होती. पॅडी व अंकिता यांनी वेळोवेळी सूरजला गेम शिकवला होता. तसंच त्याने कसं वागावे कसं बोलावे याबद्दलही सांगितले. अशातच त्याच्या विजयावरही अंकिताने तिचं मत मांडलं आहे.
आणखी वाचा – “हिरोईन बनून बाहेर आले आणि…”, जान्हवी किल्लेकरची पहिलीची प्रतिक्रिया, म्हणाली, “महाराष्ट्राला माझा राग पण…”
इट्स मज्जालं दिलेल्या मुलाखतीत अंकिता असं म्हणाली की, “बाहेरून आपण हा शो बघतो तेव्हा साहजिक आहे की, एखाद्याबद्दल आपल्याला सहानूभूती निर्माण होते आणि महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांना सहानूभूती वाटत होती. पण आपण सहानूभूती पोटी एखाद्याला बरीच मोठी गोष्ट देऊन जातो आणि तीच गोष्ट महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी सूरजला दिली आहे. ज्याचा आपल्याला मान ठेवला पाहिजे. मीसुद्धा ठेवते. असं नाही की तो यासाठी पात्र नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला जे दिलं आहे ते त्याला छानपणे सांभाळण्यासाठी आम्ही कशाप्रकारे मदत करु याकडे आमचं लक्ष आहे.
यापुढे अंकिता असं म्हणाली की, “त्याला जे मिळालं आहे ते पेलवलं पाहिजे, कारण त्याच्याकडे ती कुवत नाही. त्याला मी जेवढं ओळखते त्यावरुन त्याला पैशांची ओळख नाही आणि त्याला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान नाही. याचाच फायदा घेणारी अनेक लोक त्याच्या आजूबाजूला आहेत. त्याने आतापर्यंत केलेल्या कामाचे पैसेही त्याच्याकडे नाहीत. ‘बिग बॉस’मध्ये यायच्या आधी त्याचं बँक अकाऊंट उघडलं गेलं. त्यामुळे आता त्याला हे सगळं मॅनेज करता येणं हा त्याच्यासाठी टास्क आहे”.