Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व सोशल मीडियावर विशेष धुमाकूळ घालताना दिसलं. नुकताच या चर्चेत असलेल्या शोचा महाअंतिम सोहळा अगदी दणक्यात साजरा झाला असल्याचं पाहायला मिळालं. सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला. अभिजीत हा ट्रॉफीचा खरा मानकरी होता असं म्हणत अनेकांनी उपविजेता होताच नाराजी दर्शविली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ७० दिवस gentlemen म्हणून वावरलेल्या अभिजीतचा हा प्रवास वाखाणण्याजोगा होता. प्रत्येक टास्कमध्ये प्लॅन करत अभिजीत उत्तम खेळ खेळताना दिसला.
‘बिग बॉस’च्या घरातून उपविजेतेपद घेऊन बाहेर येताच सर्वच क्षेत्रातून त्याचं भरभरुन कौतुक केलं जात आहे. त्याच्या घरीही त्याच्या कुटुंबियांकडून जंगी स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. विजेतेपद हुकल्याबाबत अभिजीतला नेमकं कसं वाटतंय याबाबत त्याने माध्यमांसमोर खुलासा केला आहे. “आता प्रेक्षक आम्ही तुझ्या बाजूने आहोत असा पाठिंबा देताना दिसत आहेत, पण बहुमत हे सूरजच्या बाजूने होतं. महाराष्ट्र हा निर्णय घेण्यात थोडासा मागेपुढे होत होता. मन इथे होतं पण भावना तिथे होत्या, असं काहीस साऱ्यांचं झालं होतं. तर तुला याबाबाबत काय वाटतं”, असा प्रश्न अभिजीत सावंतला ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलकडून विचारण्यात आला.
याचं उत्तर देत अभिजीत म्हणाला, “लोकांना मी या गोष्टींसाठी दोष देणार नाही. मी स्वतः त्यात सामील आहे. मी स्वतः हा मोठा प्रवास केला आहे त्यामुळे मी त्याची भावना समजून घेऊ शकतो. मी एक अनुभवी माणूस आहे. ट्रॉफी उचलण्याचा हा अनुभव मी घेतला आहे. तो अनुभव त्याला नाही आहे. आणि त्याला तो अनुभव मिळायला हवाच होता ही एक गोष्ट आहे. शिवाय, तो ज्या वातावरणातून पुढे आला आहे त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तो नेहमीच असं म्हणायचा की, मी स्वतःच्या हिंमतीवर सर्वकाही करणार आणि त्याने करुन दाखवलं.
आणखी वाचा – “हिरोईन बनून बाहेर आले आणि…”, जान्हवी किल्लेकरची पहिलीची प्रतिक्रिया, म्हणाली, “महाराष्ट्राला माझा राग पण…”
पुढे अभिजीत असेही म्हणाला की, “भावनिक बाजू लक्षात घेतली तर निश्चितच ते बरोबर होतं. पण एक खेळाडू, एक प्लॅनर म्हणून ही एक शेवटची पोचपावती मिळाली असती आणि ती बॉर्डर क्रॉस केली असती म्हणून मला ट्रॉफी हवी होती. पण मी सूरजसाठी खूप खुश आहे”.