Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष गाजताना दिसलं. यंदाच्या या पर्वात प्रत्येक सदस्याने धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. अवघ्या ७० दिवसांमध्ये निरोप घेणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता कोण होणार याकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळवत यंदा अभिजीत सावंत, सूरत चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार व जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली. आता शेवटच्या क्षणी बाजीमारत ‘बिग बॉस मराठी’च्या झगमगत्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक आपलं नाव कोरणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहील आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली असून आता रितेश भाऊने हा शो होस्ट करायला सुरुवात केली आहे. तब्बल दोन आठवड्याने रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर पुन्हा परतला असल्याचे पाहायला मिळतेय. सुरुवातीला प्रेक्षकांची माफी मागत त्याने या शोला सुरुवात केली असल्याचे दिसले. आता ‘बिग बॉस’च्या घरातून तब्बल नऊ लाखांची प्राईज मनी घेत जान्हवी किल्लेकर घराबाहेर पडली आहे. जान्हवीचा या घरातील प्रवास संपला असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, आता ‘बिग बॉस मराठी’ला पाच फायनलिस्ट मिळाले आहेत. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार हे पाच स्पर्धक आता ‘बिग बॉस’च्या घरात आहेत. दरम्यान, या भागात प्रसिद्ध ज्योतिष यांनी केलेल्या अनुमानानुसार ‘बिग बॉस’च्या टॉप तीन स्पर्धकांची नाव समोर आली आहेत. ‘बिग बॉस मराठी’सीझन ५ मध्ये अभिजीत सावंत, निक्की तांबोळी व सूरज चव्हाण हे टॉप तीन स्पर्धक असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?
तर अंकिता वालावलकर व धनंजय पोवार हे स्पर्धक टॉप ३ मध्ये नसल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता अभिजीत, सूरज व निक्की या स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक ट्रॉफीवर नाव कोरणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.