Bigg Boss Marathi 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ अवघ्या काही वेळातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यंदाच्या या पर्वाचा महाअंतिम सोहळा दणक्यात सुरु असलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या सीजन पाचच्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक नाव कोरणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिले. अशातच ‘बिग बॉस’च्या सहा फायनलिस्ट मधून आता एका स्पर्धकाची एक्झिट झालेली पाहायला मिळतेय. हा स्पर्धक म्हणजेच कोल्हापूरचा रांगडा गडी आणि रील स्टार धनंजय पोवार म्हणजेच सर्वांचा लाडका डीपी. उत्तम उत्तम स्ट्रॅटर्जी प्लॅन करत ‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून खेळत असलेल्या धनंजय पोवारने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली.
फक्त कोल्हापुरातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून धनंजयला भरभरुन पाठिंबा मिळताना पाहायला मिळाला. मात्र या शर्यतीमध्ये धनंजय मागे राहिला आणि ट्रॉफीसाठी तो मुकलेला दिसला. नुकतीच धनंजय पोवारची ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट झाली असल्याचे समोर आलं आहे. मनाने अत्यंत हळव्या असलेल्या आणि कुटुंबाची नेहमीच आठवण काढणाऱ्या आणि आदर करणाऱ्या या धनंजयचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास हा वाखाणण्याजोगा होता. टीम बी मध्ये प्रत्येक स्पर्धकाशी खऱ्या वागणाऱ्या धनंजयने स्वतःला या शोमध्ये कधीच बदललं नाही.
आणखी वाचा – Big Boss 18 मध्ये गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री, डायलॉगबाजी ऐकून सलमान खानला हसू अनावर, पाहा खास प्रोमो
तो जसा आहे तसाच अगदी शेवटपर्यंत राहिला. धनंजय पोवारचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अनेकदा तो त्याच्या आई व बायकोबरोबर महिलांवर लक्ष केंद्रित करणारे आशयघन विषय घेऊन रील व्हिडिओ शेअर करताना दिसतो आणि त्याच्या या रीलला समस्त महिलावर्ग विशेष पसंती देताना दिसतात.
आणखी वाचा – मोबाइल ॲप घोटाळ्याप्रकरणी रिया चक्रवर्ती व भारती सिंह यांना पोलिसांकडून समन्स, नेमकं प्रकरण काय?
‘बिग बॉस’च्या घरात फॅमिली वीकमध्ये धनंजयचे आई-वडील, बायको यांची भेटही पाहायला मिळाली यावेळी धनंजय विशेष भावुक झालेला दिसला. आता ‘बिग बॉस’च्या घरातून धनंजयने एक्झिट घेतली असली तरी प्रेक्षकांच्या मनात त्याने स्थान निर्माण केलं आहे. आता उरवीरत सदस्यांमध्ये ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक नाव कोरणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.