Bigg Boss Marathi 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी सीजन ५’ हे यंदाचं पर्व विशेष गाजलं. यंदाच्या या पर्वात कलाकार मंडळींसह गायक, रॅपर, रील स्टार या क्षेत्रातील मंडळींना उत्तम प्लॅटफॉर्म मिळाला असल्याचे पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात मालिका विश्वातील लोकप्रिय अशी खलनायिका म्हणजेच जान्हवी किल्लेकरच्या एन्ट्रीने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. जान्हवीने अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. मात्र अंतिम सोहळ्यातील ट्रॉफीपर्यंतचा जान्हवीचा प्रवास संपला असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतीच बिग बॉसच्या घरातून लोकप्रिय खलनायिका जान्हवी किल्लेकरने एक्झिट घेतली असल्याचे पाहायला मिळतेय.
यंदाच्या ट्रॉफीची मानकरी जान्हवी होईल असे अनेकांना वाटत असताना तिने ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतली असल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. सुरुवातीला जान्हवीचा रागावरचा ताबा सुटल्यानंतर ज्येष्ठ कलाकारांचा केलेला अपमान हा अनेकांना खटकला. यावेळी जान्हवीची अनेकांनी कान उघडणी केलेली असलेली पाहायला मिळाली. शिवाय भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवीची शाळा घेत तिला चांगलेच खडसावले आणि तिला एक आठवडा जेलमध्ये राहण्याची शिक्षा सुनावली.
आणखी वाचा – हार्दिकच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अक्षयाची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट, म्हणाली, “माझ्या हास्याचे कारण…”
मात्र जेलमध्ये राहून आल्यानंतर जान्हवीने पॅडी कांबळे यांची माफी मागितलेली दिसली. या एका मोठ्या चुकीनंतर जान्हवीने स्वतःच्या रागावर उत्तम कंट्रोल केला असल्याचे दिसलं आणि ती टास्कमध्ये ही उत्तम खेळ खेळताना दिसली. मात्र कालांतराने ती कोणत्याही टीममधून नाही तर स्वतः स्वतंत्र खेळत होती. जान्हवीने ‘बिग बॉस’च्या घरात उत्तम टास्क करत प्रेक्षकांची मन जिंकली. शिवाय जान्हवीच्या चाहत्यांनी तिला भरभरुन पाठिंबाही दिसला. आता या घरातून जान्हवीने निरोप घेतलेला पाहायला मिळत आहे. जान्हवीने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर जाताना तब्बल नऊ लाख रुपये घेतले आहेत. ही प्राइझ मनी घेऊन जान्हवीने घराबाहेर पाऊल टाकलं आहे.
आणखी वाचा – मोबाइल ॲप घोटाळ्याप्रकरणी रिया चक्रवर्ती व भारती सिंह यांना पोलिसांकडून समन्स, नेमकं प्रकरण काय?
इतकंच नव्हे तर कुटुंबीयांकडूनही जान्हवीचा भरभरुन कौतुक झालेलं दिसलं. उत्तम खेळणाऱ्या टास्कमध्ये लक्ष केंद्रित करणाऱ्या आणि कायमच तिच्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना मोहून टाकणाऱ्या जान्हवीचा या घरातील प्रवास हा नुकताच संपला असल्याचे दिसत आहे. जान्हवीने आजवर अनेक मालिका विश्वातून खलनायिकाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर जान्हवीने ‘बिग बॉस’मध्ये ही चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला.