सध्या टेलिव्हिजनवरवर ‘बिग बॉस’मराठीची चर्चा सुरु आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. सहाव्या आठवड्यात भाऊचा धक्का हा विशेष कार्यक्रम पार पडला. या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट होते. अरबाज पटेल, आर्या जाधव, निक्की तांबोळी, धनंजय पवार, अभिजीत सावंत, छोटा पुढारी घन:श्याम दरवडे व सूरज चव्हाण या सात जणांना सगळ्यांनी मिळून नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अशातच भाऊच्या धक्क्यावर अचानक नॉमिनेशन प्रक्रिया झाली याने सगळ्यांना धक्का बसला. यंदाच्या या पर्वातून सर्वांच्या लाडक्या छोटा पुढारीला म्हणजेच घनःश्याम दरवडेला निरोप घ्यावा लागला. (ghanshyam darvade on nikki tamboli)
घनःश्याम घराबाहेर पडल्यानंतर त्याने ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलबरोबर संवाद साधला. यावेळी त्याने घरातील इतर मंडळींबद्दलदेखील भाष्य केले. त्याला विचारले की, “टॉप ५ मध्ये कोणते स्पर्धक जातील?”, त्यावर त्याने सुरज चव्हाण, अरबाज पटेल, वैभव चव्हाण व वर्षा उसगावकर यांची नावं घेतली. त्यानंतर निक्की तांबोळीबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला की, “निक्कीचं व माझं नातं पवित्र आहे. ती माझ्या बहिणीसारखी आहे. त्यामुळे ती कशी खेळेल याबद्दल थोडी शंका आहे. माझ्या बहिणीने जिभेवर ताबा ठेवावा. आता तिथे तिला समजवायला कोणीही नाही”.
पुढे तो म्हणाला की, “पहिल्यांदा तिचा राग बघून थांबवायला लागायचं. मी तिला थांबवत असे. पण आता काहीतरी वेगळंच होताना दिसणार आहे”. त्यावर तिला विचारलं की, “आता निक्कीचा खेळ बिघडणार का?”, त्यावर तो म्हणाला, “बिघडणार तर नाही पण थोडी गडबडू शकते”.
दरम्यान आता ‘बिग बॉस’मध्ये निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, अभिजीत सावंत, धनंजय पवार, आर्या जाधव तसेच वाइल्ड कार्ड एंट्री संग्राम चौगुले यांचा समावेश आहे. त्यामुळे आता टॉप ५ मध्ये कोण जाणार? तसेच विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.