गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवात सुरुची-पियुष करत आहेत एन्जॉय, दोघांनी मिळून मोदकही बनवले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 9, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
suruchi adarkar and piyush ranade celebrates ganeshotsav

लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावाचा सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ

गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळीही गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत. अनेक कलाकार मंडळींच्या घरी गणरायाचे आगमन झाले असल्याचं पाहायला मिळालं. तर काही कलाकार मंडळी परदेशातून भारतात गणेशोत्सवासाठी आलेले दिसले. अशातच टेलिव्हिजनवर कार्यरत कलाकार जोडीच्या गणेशोत्सवातील एक सुंदर असा व्हिडीओ समोर आला आहे. ही जोडी म्हणजे अभिनेता पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची अडारकर. आजवर अनेक मालिकांमध्ये काम करुन आपलं एक वेगळं अस्तित्त्व निर्माण केले आहे. (suruchi adarkar and piyush ranade celebrates ganeshotsav)

गणेशोत्सवातील सुंदर असा एक व्हिडीओ सुरुचीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सुरुची व पियुष त्यांचा लग्नानंतरचा पहिलाच गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहेत. गणपती बाप्पांसाठी मोदक करत असतानाचा व्हिडीओ सुरुचीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुची व पियुष दोघे एकत्र मिळून बाप्पासाठी खास उकडीचे मोदक करताना दिसत आहेत. खास या सणासाठी सुरुचीने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – “रितेश सरांशी माझं वाजलं होतं…”,भाऊच्या धक्क्यावरील ‘त्या’ वादावर छोटा पुढारीने सोडलं मौन, म्हणाला, “मैत्रीला डाग लावून…”

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? N ???????????????????????????? (@suruchiadarkar)

सुरुचीने हा व्हिडीओ पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “गणपती बाप्पा मोरया! बाप्पा, तुझ्या येण्याने सुख, समृद्धी, आरोग्य, शांती लाभले आहे. असंच सगळ्यांनी आनंदी आणि समाधानी रहावं हीच तुझ्या चरणी प्रार्थना. तुझा आशीर्वाद असाच कायम असू दे. पियुष तू बाप्पाचा आशीर्वाद आहेस. माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी तू बरोबरीने माझ्या बरोबर उभा असतोस. सगळी कामं वाटून बरोबरीने करतोस. माझ्या आयुष्यातील प्रत्येक पावलावर तितकाच सहभाग दाखवतोस म्हणून खूप प्रेम”.

आणखी वाचा – संग्राम चौगुलेच्या मते ‘हे’ आहेत ‘बिग बॉस’च्या घरातील Top 5 स्पर्धक, निक्कीची उडवली खिल्ली, म्हणाला,”कॅमेरासमोर दिसायचं…”

लग्नानंतर पियुष व सुरुची बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली. लग्नानंतर दोघांचा सुखी संसार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सुरुची व पियुष यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. शाही थाटामाटात व अगदी पारंपरिक अंदाजात त्यांनी हा विवाहसोहळा उरकला.

Tags: marathi celebrity couplesuruchi adarkar and piyush ranadesuruchi adarkar and piyush ranade celebrates ganeshotsav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
arbaz patel girlfriend post

अरबाजच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियाला राम राम, असं करण्यामागचं नेमकं कारण तरी काय?  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.