शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गावी फिरत आहेत वैभव चव्हाण व इरिना रुडाकोवा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “जमलं वाटतं?”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 16, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vaibhav Chavan And Irina Rudakova

गावी फिरत आहेत वैभव चव्हाण व इरिना रुडाकोवा

Vaibhav Chavan And Irina Rudakova : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सीझन संपलं असलं तरी या पर्वाची क्रेझ काही कमी झालेली दिसत नाही. यंदाच्या पर्वातील सगळेच स्पर्धक विशेष चर्चेत असलेले पाहायला मिळाले. यंदाच्या या पर्वात अगदी पहिल्या आठवड्यातच घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसले. अरबाज पटेल व निक्की तांबोळी यांची लव्हस्टोरी पाहायला मिळाली अगदी घराबाहेरही त्यांची ही लव्हस्टोरी पाहायला मिळतेय. तर आणखी दोन स्पर्धकांमध्ये खास नातं पाहायला मिळत आहे ते म्हणजे वैभव व इरीना. वैभवने इरिनाचं वारंवार कौतुक केल्याचे आणि तिला जास्त महत्त्व दिल्याचे अनेकदा पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र राहिल्यामुळे अनेकदा त्यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या काही भागात वैभव व इरीना हे एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी इरीनाने वैभवच्या मांडीवर पाय ठेवले असल्याचेही प्रेक्षकांनी पाहिले. हा प्रवास सुरु असताना इरिना वैभव चव्हाणच्या प्रेमात पडली. इरिना व वैभवची प्यारवाली लव्हस्टोरी ‘बिग बॉस’च्या घरात पाहणं रंजक ठरलं. घराबाहेर पडल्यानंतर इरिनाने तिच्याजवळचे साठवलेलं पैसे वैभवला दिले. इरिना घराबाहेर जाताच वैभव भावुक झालेला दिसला.

आणखी वाचा – “तू असा प्रचार करणं चुकीचं”, लाडकी बहिण जाहिरातीचा व्हिडीओ केल्यानंतर अमृता खानविलकर ट्रोल, म्हणाले, “गैरवापर…”

View this post on Instagram

A post shared by IRINA RUDAKOVA (@irina.rai9)

‘बिग बॉस मराठी’ संपल्यानंतर अखेर आता इरिना व वैभव यांची भेट झाली आहे. यावेळी ते दोघे एकत्र हिंडताना दिसत आहेत. वैभव इरिनाला घेऊन त्याच गाव दाखवत आहे. बारामतीत गेल्यावर इरिना व सूरजची भेटही झाली. यानंतर आता त्याने इरिनाबरोबर एक सुंदर रीलही शूट केला आहे. यांत इरिनाने जपलेल्या मराठमोळ्या संस्कृतीचं कौतुक वैभवने कौतुक केलं. हा व्हिडीओ पाहून अनेकजण या जोडीला पसंती दर्शवित आहेत.

आणखी वाचा – Video : भर कॉन्सर्टमध्ये पती निक जोनासला मारण्याचा प्रयत्न?, जीव मुठीत घेऊन पळाला अन्…; प्रियांका चोप्राही चिंतेत

रांगड्या मातीत ‘परदेसी’ प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले गेले. पण त्यांच्यामध्ये मैत्रीपलीकडे फार काही दिसून आलं नाही. त्यांच्या मैत्रीबद्दल बोलताना वैभव म्हणाला,“इरीनाबरोबर राहताना कोणतीच गोष्ट घडवून आणलेली नव्हती. आमची मैत्री ही खूपच छान आणि निरागस होती. इरीनाबरोबरचे घरातील क्षण चांगले गेले. त्यामुळे हीच मैत्री घराबाहेरही राहावी अशी माझी इच्छा आहे”.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5Vaibhav Chavan And Irina Rudakova
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
Next Post
Bigg Boss Marathi Social Media Influensar

Bigg Boss Marathi कार्यक्रम संपला, पण आता शोमध्ये सहभागी झालेले रिलस्टार कसं जगतात आयुष्य?, सध्या काय करतात?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.