Vaibhav Chavan And Irina Rudakova : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सीझन संपलं असलं तरी या पर्वाची क्रेझ काही कमी झालेली दिसत नाही. यंदाच्या पर्वातील सगळेच स्पर्धक विशेष चर्चेत असलेले पाहायला मिळाले. यंदाच्या या पर्वात अगदी पहिल्या आठवड्यातच घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसले. अरबाज पटेल व निक्की तांबोळी यांची लव्हस्टोरी पाहायला मिळाली अगदी घराबाहेरही त्यांची ही लव्हस्टोरी पाहायला मिळतेय. तर आणखी दोन स्पर्धकांमध्ये खास नातं पाहायला मिळत आहे ते म्हणजे वैभव व इरीना. वैभवने इरिनाचं वारंवार कौतुक केल्याचे आणि तिला जास्त महत्त्व दिल्याचे अनेकदा पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र राहिल्यामुळे अनेकदा त्यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या काही भागात वैभव व इरीना हे एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी इरीनाने वैभवच्या मांडीवर पाय ठेवले असल्याचेही प्रेक्षकांनी पाहिले. हा प्रवास सुरु असताना इरिना वैभव चव्हाणच्या प्रेमात पडली. इरिना व वैभवची प्यारवाली लव्हस्टोरी ‘बिग बॉस’च्या घरात पाहणं रंजक ठरलं. घराबाहेर पडल्यानंतर इरिनाने तिच्याजवळचे साठवलेलं पैसे वैभवला दिले. इरिना घराबाहेर जाताच वैभव भावुक झालेला दिसला.
‘बिग बॉस मराठी’ संपल्यानंतर अखेर आता इरिना व वैभव यांची भेट झाली आहे. यावेळी ते दोघे एकत्र हिंडताना दिसत आहेत. वैभव इरिनाला घेऊन त्याच गाव दाखवत आहे. बारामतीत गेल्यावर इरिना व सूरजची भेटही झाली. यानंतर आता त्याने इरिनाबरोबर एक सुंदर रीलही शूट केला आहे. यांत इरिनाने जपलेल्या मराठमोळ्या संस्कृतीचं कौतुक वैभवने कौतुक केलं. हा व्हिडीओ पाहून अनेकजण या जोडीला पसंती दर्शवित आहेत.
रांगड्या मातीत ‘परदेसी’ प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले गेले. पण त्यांच्यामध्ये मैत्रीपलीकडे फार काही दिसून आलं नाही. त्यांच्या मैत्रीबद्दल बोलताना वैभव म्हणाला,“इरीनाबरोबर राहताना कोणतीच गोष्ट घडवून आणलेली नव्हती. आमची मैत्री ही खूपच छान आणि निरागस होती. इरीनाबरोबरचे घरातील क्षण चांगले गेले. त्यामुळे हीच मैत्री घराबाहेरही राहावी अशी माझी इच्छा आहे”.