Bigg Boss Marathi Social Media Influensar : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष गाजलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावर रील स्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने नाव कोरलं. सूरज चव्हाणच सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. तर गायक अभिजीत सावंत हा उपविजेता ठरला. इतकंच नव्हे तर टॉप ५ मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हवा असलेली पाहायला मिळाली. अंकिता वालावलकर व धनंजय पोवार या रील स्टारला यंदाच्या टॉप ५ मध्ये जागा मिळाली. अंकिता वालावलकर पाचव्या क्रमांकावर तर धनंजय पोवार चौथ्या क्रमांकावर होती. घराबाहेर आल्यानंतर आता सगळेच स्पर्धक चर्चेत दिसले.
‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर आल्यानंतर आता ही रील स्टारची गॅंग नेमकं काय करतेय याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात असताना ही रील स्टारची गॅंग धमाल करताना दिसली. आता घराबाहेर आल्यानंतर हे तीनही रील स्टार त्यांच्या त्यांच्या कामाला लागले आहेत. सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीचा आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज त्याच्या गावाकडे गेला आहे. सध्या त्याचा त्याच्या गावात सत्कार, कौतुक होताना पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर आता सूरजचा आगामी ‘राजा राणी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या त्याच्या कौतुक सोहळ्यात तो रमलेला दिसत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात कोल्हापूरची शान असलेल्या डीपीने साऱ्यांच्या मनावर राज्य केले. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर धनंजय पुन्हा एकदा कामावर परतला असल्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. “कितीही मोठी उंची प्राप्त होऊदे आपली पायरी आपण सोडायची नाही”, असं कॅप्शन देत त्याने दुकानातल्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला. धनंजयचं सोसायटी या नावाने स्वतःच फर्निचरचं दुकान आहे. याशिवाय त्याने रील व्हिडीओही बनवायला सुरुवात केली आहे.
सुप्रसिद्ध रील स्टार कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घातला. अंकिता वालावलकर ही कंटेंट क्रियेटर बिझनेस वुमन तसेच Vlogger आहे. अंकिताने सुरुवातीला टिकटॉक पासून तिचा प्रवास सुरु केला. पण थोड्याच दिवसात टिकटॉक बंद केले. कोकण हार्टेड गर्लचे मालवण येथे स्वतःचे रिसॉर्ट आहे. शिवाय तिचा संधुद्योग या नावाने व्यवसायही आहे याची सध्या अंकिता तयारी करत आहे. गेले ७० दिवस ‘बिग बॉस’च्या घरात असल्याने व्यवसायाकडे तिचं दुर्लक्ष झालं त्यामुळे आता ती या व्यवसायाच्या तयारीला लागली असल्याचं समोर आलं आहे.