Dhananjay Powar And Ankita Walavalkar Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष गाजताना दिसलं. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा पाहायला मिळाली. सूरज चव्हाण या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर कोरले. तर पहिल्या पाच मध्ये आणखी दोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स पोहोचलेले दिसले. ‘बिग बॉस’च्या घरातील चर्च असलेली ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची जोडी म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवार. अंकिता व डीपी या जोडीने ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घातला, तर घराबाहेरही ही जोडी एकमेकांना भेटताना दिसली. अंकिताने नवऱ्यासह कोल्हापूर गाठत डीपीच्या घरी भेट दिली. तर कामानिमित्त मुंबईत आलेल्या डीपीनेही कुणालची भेट घेतलेली पाहायला मिळाली.
‘बिग बॉस मराठी’मुळे अंकिता वालावलकर आणि धनंजय पवार ही भावा-बहिणीची जोडी अधिक चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर ही जोडी नेहमी सक्रिय असते. एकमेकांच्या भेटीदरम्यानचे अनेक व्हिडीओ, फोटो दोघेही सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच धनंजयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कुणाल व अंकिता हे दोघेही कोल्हापुरात धनंजयच्या घरी गेलेले असतात. तेव्हा धनंजयच्या आईच्या हस्ते अंकिता वालावलकरच स्वागत करण्यात येतं.
पुष्पगुच्छ घेऊन धनंजय अंकिताजवळ येते. तेव्हा अंकिता म्हणते की, “एवढं कशाला आणायचं”. यावर धनंजय मागून बोलताना दिसतोय की, “दुपारी एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा हे मला मिळालं म्हटलं आता वेगळं कशाला आणायला हवं”, असं म्हणत ते पुष्पगुच्छ देतात आणि अंकिता पुष्पगुच्छ स्वीकारते. “तिला वाटले विकत आणलंय”,असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताची फजिती झालेली या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी यावर हसण्याचे ईमोजी शेअर केलेले पाहायला मिळत आहेत.
अंकिता व धनंजयचा हा खोडी काढतानाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत, “असाच असतो भाऊ लहान लहान खोड्या काढणारा”, “अरे देवा एवढं खरं कोण बोलतं?”, “हे एकदम भारी होतं”, “एवढं खरं बोलायचं नव्हतं डीपी दादा”, अशा अनेक कमेंट केल्या आहेत.