Abhishek Gaonkar Wedding : ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गांवकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आज अभिनेता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सोनाली गुरवसह विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाली व अभिषेकच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळालं. नुकताच दोघांचा धुमधडाक्यात हळदी समारंभ पार पडला. तर मेहंदी सोहळ्याचेही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. काही महिन्यांपूर्वीच अभिषेक व सोनाली यांचा साखरपुडा समारंभ पार पडलेला पाहायला मिळाला. आता अभिषेक व सोनाली यांच्या लग्नाच्या उत्सुकतेलाही काही वेळातच पूर्णविराम मिळणार आहे. अभिगॉटसोना असे हॅशटॅग वापरुन त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.
अशातच अभिषेकच्या लग्न सोहळ्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नमंडपात सर्व मंडळी जमलेली दिसत आहेत. दरम्यान, संगीताची मैफिल रंगलेली हा व्हिडीओ अभिनेत्री सुरुची अडारकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सुरुची अडारकरने नवऱ्यासह म्हणजेच पियुष रानडेसह हजेरी लावली आहे. याशिवाय सिनेसृष्टीतील इतरही कलाकार मंडळी अभिषेकच्या लग्नाला पोहोचले आहेत. अशोक शिंदे, भक्ती देसाई ही कलाकार मंडळीही लग्नाला हजर आहेत.
सुरुचीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गाण्यांची मैफिल रंगलेली पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये पियुष रानडे स्वतः ही मैफिल घेताना दिसत आहे. यावेळी तो “प्यार हमें किस मोड पे लाया”, हे गाणं गाताना दिसत आहे. एकूणच अभिषेक-सोनाली गाण्यांच्या मैफिलीचा आनंद लुटताना दिसत आहे. सोनाली व अभिषेकच्या मेहंदी व हळदी सोहळ्याचे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. मेहंदी समारंभाला सोनालीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तर अभिषेकने सोनालीला कॉन्ट्रास असा मोरपिसी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर हळदीला दोघांनीही गुलाबी रंगाचे कपडे परिधान केलेले दिसले.
‘सारं काही तिच्यासाठी’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेमुळे अभिषेक सर्वत्र चर्चेत आला. यामध्ये अभिषेक गावकरने ‘श्रीनू’ ही भूमिका साकारली होती. सारं काही तिच्यासाठी मालिकेव्यतिरिक्त ‘रात्रीस खेळ चाले’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं,’ ‘माझी माणसं’, ‘हंड्रेड डेज’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे. तर सोनाली गुरव एक सोशल मीडिया इस्फ्लुअन्सर आहे. ती इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.