Dhananjay Powar Friendship Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ या पर्वाची सर्वत्र विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस मराठी’च्या या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने नाव कोरलं. तर उपविजेता अभिजीत सावंत ठरला. ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वाची विशेष बाब म्हणजे कलाकारांबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यंदाच्या या विजेतेपदावरही एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं नाव आलं. तर पाचव्या स्थानावरुन अंकिता वालावलकर घराबाहेर पडली. तर चौथ्या स्थानापर्यंत धनंजय पोवारने मजल मारली. या सर्वच स्पर्धकांनी त्यांच्या खेळाने आणि वागण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान, कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवारची यंदा विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
करोना लॉकडाऊनमध्ये अनेकांनी घरबसल्या कंटेंटची निर्मिती केली. घरातल्या छोट्या मोठ्या गंमती जमती सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून शेअर केल्या. अनेकांचे रील्स प्रचंड व्हायरल झाले. बरेचजण या काळात सोशल मीडिया स्टार म्हणून लोकप्रिय झाले. त्यापैकी एक म्हणजे धनंजय पोवार. आई व सूनेच्यामध्ये अडकलेल्या नवऱ्याचे मजेशीर व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर करणं सुरु केलं. त्याचे हे व्हिडीओ घराघरांत पाहिले गेले. आणि त्याच्या या लोकप्रियतेवर त्याला ‘बिग बॉस मराठी’मध्ये एंट्री मिळाली.
आणखी वाचा – Bigg Boss 18 मध्ये येताच गुणरत्न सदावर्तेंचा राडा, तुफान डायलॉगबाजी, म्हणाले, सगळ्यांना खळखळून हसवलं अन्…
आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही धनंजयने स्वतःच स्थान निर्माण केलं. धनंजयने त्याच्या विनोदी शैलीने रसिकांच्या मनावर ताबा मिळवला. शिवाय घरातील सदस्यांचेही त्याने मनोरंजन केलं. प्रेक्षकांचा हा लाडका डीपी ‘बिग बॉस मराठी’च्या टॉप ५ मध्ये दिसला. मात्र चौथ्या क्रमांकावरचं त्याला बाहेर पडावं लागलं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर धनंजयचं जंगी स्वागत झालेलं पाहायला मिळालं. शिवाय मूळचा कोल्हापूरचा असलेला डीपी आता ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर त्याच्या गावी परतला आहे.
‘बिग बॉस’च्या घरात ७० दिवस झाल्यानंतर आता डीपी त्याच्या मूळ गावी गेला आहे. तिथे जाताच कुटुंबाला भेटल्यानंतर तो त्याच्या मित्रांसह वेळ घालवताना दिसत आहे. “७० दिवसांनंतर तुझ्या मैत्रीत फरक पडला नाही”, असं कॅप्शन देत डीपीच्या मित्राने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये डीपी त्याच्या मित्रांना घास भरवताना दिसत आहे. यावरुन त्यांची मैत्री पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातही डीपीची अंकिताबरोबरची मैत्री पाहायला मिळाली.