Ankita Walavalkar On Relationship : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील कोकण हार्टेड गर्लच्या एण्ट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंकिताच्या येण्याने अनेकांना आनंद झालेला पाहायला मिळाला. कलाकार मंडळीही अंकिताला सपोर्ट करताना दिसली. ‘बिग बॉस’च्या टॉप ५ च्या यादीमध्ये अंकिता वालावलकर पाहायला मिळाली. मात्र अंकिताचा ट्रॉफीपर्यंतचा प्रवास हा अपूर्ण राहिला. असं असलं तर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. कोकणी भाषेवर प्रभुत्त्व असणाऱ्या अंकिताने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘बिग बॉस’मधून घराबाहेर पडल्यावर अंकिताचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
आता घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “आता मी लवकरच सगळं सांगणार आहे. लवकरच कोकणहार्टेड गर्लचं लग्न असेल आणि तेव्हाच तुम्हाला मी सांगेल. असं काही नाही आहे की, मी माझं नातं लपवून ठेवतेय. पण माझ्यामुळे त्याला काही त्रास होऊ नये कारण आम्ही दोघेही एकाच इंडस्ट्रीमधील आहोत. त्याचं काम फार वेगळं आहे, माझं काम वेगळं आहे. आणि मी आता अशा शो मधून बाहेर आले तर आता आधी मला सेटल व्हायचं आहे. माझे काही नवे प्रोजेक्ट सुरु झाले की, मी नक्कीचं आमच्या नात्याबद्दल सांगेल”.
‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधी अंकिताच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेअर करण्यात आली होती. अंकिताने ही पोस्ट खास तिच्या नवऱ्यासाठी शेअर केली होती. या पोस्टवरुन अंकिता लग्न करणार असल्याचं समोर आलं. मात्र अंकिताचा होणारा नवरा नेमका कोण आहे हे गुपित समोर आलेलं नाही. ‘बिग बॉस’मध्ये असतानाही अंकिताने बरेचदा तिच्या होणाऱ्या नवऱ्याची आठवण काढली. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताने असा खुलासा केला की, बॉयफ्रेंडला लग्नासाठी होकार देण्यापूर्वी त्याच्याशी गणपती विषयी चर्चा केली. अंकिताच्या बॉयफ्रेंडच्या घरी ७ दिवसांचा गणपती येतो. तर तिच्याही घरी सातच दिवसांचा गणपती असतो.
आणखी वाचा – “मला ट्रॉफी हवी होती कारण…”, अभिजीत सावंतचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “सूरजसाठी खुश आहे पण…”
पुढे तिने असंही सांगितलं की, तिच्या बॉयफ्रेंडने तिला सुचवलं की, तिने तिच्या घरचा गणपती ९ दिवसांचा करावा म्हणजे शेवटचे दोन दिवस ती आपल्या माहेरी जाऊन गणपतीचं सर्व काही करु शकेल. पण अंकिताला हा निर्णय योग्य वाटत नव्हता. यावर उपाय म्हणून गणपतीची पूर्वतयारी झाल्यावर सासरी दोन दिवस गणेशोत्सव साजरा करेल आणि नंतर पुन्हा आपल्या माहेरी आपल्या गणपतीचं पाहायला येईल, असं तिने ठरवलं.