शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “वोटनुसार ते सेफ होते”, पॅडी कांबळेच्या एक्झिटवर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “वर्षा उसगांवकर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 30, 2024 | 10:44 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 paddy kamble exit

'बिग बॉस'च्या घरातून पॅडी बाहेर पडताच प्रेक्षकांनी दाखविली नाराजी

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून अभिनेता पॅडी कांबळे घराबाहेर पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. नवव्या आठवड्यात झालेल्या एलिमिनेशनमध्ये घरातील आठही सदस्य नॉमिनेट झाले होते यावेळी या घरातून पॅडी कांबळेला त्याचा प्रवास संपवत निरोप घ्यावा लागला असल्याचा पाहायला मिळालं. कमी मत पडली असल्याने पॅडीला ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट मिळालेली पाहायला मिळाली. दरम्यान निक्की तांबोळी, सूरज चव्हाण हे स्पर्धक पहिल्याच फेरीत सेफ झाले तर वर्षाताई आणि अभिजीत हे दुसऱ्या फेरीत सेफ झालेले पाहायला मिळाले.

त्यानंतर धनंजय, अंकिता व जान्हवी ही स्पर्धक मंडळी ही सेफ असलेली पाहायला मिळाली. पॅडीने यंदाच्या या पर्वात अत्यंत चतुराईने अगदी पहिल्या दिवसापासून खेळी खेळत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सुरुवातीला पॅडी तितकासा खेळत नसल्याने रितेश भाऊने त्याचा चांगलाच क्लासही घेतलेला पाहायला मिळाला. “प्रेक्षक म्हणून तुम्ही इथे आला आहात का?”, असा सवाल त्याने पॅडीला केला त्यानंतर त्याने काही मागे वळून पाहिलं नाही. प्रत्येक स्पर्धकाला भिडत वयाचं कोणतही कारण न देता तो प्रत्येक टास्कमध्ये, प्रत्येक खेळामध्ये तितक्याच चतुरतेने लढत गेला. त्याचा हा खुमासदार प्रवास साऱ्यांच्याच पसंतीस पडला. पॅडीच्या एक्झिटनंतर आता प्रेक्षक मंडळींनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : ड्युटीवरुन अंकिता व अभिजीतमध्ये वादाची ठिणगी, टीम बी मधून एक्झिट घेणार का?, डीपीचाही आवाज चढला

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

पॅडी कांबळे हा उत्तम खेळ खेळत होता त्यामुळे त्याला कमी वोट पडणं अर्थातच चुकीच आहे, असं मत मांडत हा खेळ पक्षपाती असल्याचं अनेकांनी म्हटलं. पॅडीच्या एक्झिटच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत पॅडी कांबळे ऐवजी वर्षा उसगांवकर एलिमिनेट व्हायला पाहिजे होत्या, असं अनेकांनी म्हटलं. वर्षाताईंचा घरातील वावर, खेळातील चतुरता ही पॅडीपेक्षा थोडीशी मागेच असलेली पाहायला मिळाली. त्यामुळे फिनाले वीकमध्ये जाणं पॅडी डिझर्व करत होता असं अनेकांनी म्हणत कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – दोन आठवडे रितेश देशमुखचा भाऊचा धक्का झालाच नाही, पण यामागचं नेमकं कारण काय?

“वर्षा ताई आणि जान्हवीपेक्षा पॅडी भाऊ जास्त चांगले खेळत होते. त्यांना नक्कीच चांगले वोट होते”, “सरळ सरळ सर्वांना माहीत होत वर्षा ताई जात होत्या”, “वर्षाताईच्या जागी आज पॅडी दादाला बाहेर काढलं”, “वोटनुसार पॅडी दादा सेफ होते निक्की जायला पाहिजे होती”, “वर्षा उसगांवकर जायला पाहिजे होत्या”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी दर्शविली आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5paddy kamble exit
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mithun Chakraborty Awarded

Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, चित्रपटसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.