Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस’ म्हटलं की वाद हा आलाच. ‘बिग बॉस मराठी’चं घर हे वादासाठी ओळखलं जातं. सध्या ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरु आहे. या पर्वातील स्पर्धकांनी हे पर्व विशेष गाजवलं आहे. टीआरपीच्या शर्यतीतही हे पर्व विशेष पुढे असलेलं दिसलं. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हे पर्व १०० दिवसांचे नसून आता ७० दिवसांचे असणार आहे. लवकरच या पर्वाचा शेवट होणार असून यंदा कोणता स्पर्धक बाजी मारणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. दरम्यान, स्पर्धकांचा फिनाले वीक पर्यंतचा प्रवास सुरु झाला आहे. गेले नऊ आठवडे स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घालत हा प्रवास पूर्ण केलेला पाहायला मिळत आहे.
अगदी पहिल्या आठवड्यापासून ‘बिग बॉस’च्या या घरात राडे होताना पाहायला मिळाले. तर आता फिनाले वीक असूनही स्पर्धक मंडळी भांडण करणं काही सोडत नाहीत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, टीम बी मधील अंकिता वालावलकर व अभिजीत सावंत यांच्यात वाद झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून अंकिता व अभिजीत एकत्र खेळताना दिसले. टीम बी मधून दोघे खेळताना दिसले आणि त्यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळाली. अनेकदा वाद होऊनही ते एकत्र दिसले. मात्र काही दिवसांपासून अभिजीत हा टीम बी पासून दूर राहताना दिसला.
आणखी वाचा – फिनाले वीकपर्यंत पोहोचले ‘बिग बॉस”च्या घरातील सात स्पर्धक, ट्रॉफीवर कोण नाव कोरणार?, उत्सुकता वाढली
समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंकिता व अभिजीत यांच्यात ड्युटीवरुन भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. अंकिता अभिजीतला म्हणते, “हिला डायनिंग टेबल देऊन तू संपूर्ण बाथरुमची जबाबदारी तू स्वतःवर घेत आहेस?”. यावर अभिजीत अंकिताला म्हणतो, “तुला जर वाटत असेल तर तू तिला बोल”. यावर अंकिता म्हणते, “सगळीकडे तू gentlemen म्हणून येतोस आता इथे पण ये”. यावर अभिजीत म्हणतो, “मी माझ्या ड्युटी माझ्या सुविधेप्रमाणे घेतो. त्यात माझी काय चूक आहे?”. यावर अंकिताचा पारा चढतो, तर डीपीही अभिजीतवर भडकतो, आणि “तू कोणाला सांगतोयस?”, असं अभिजीतला विचारतो.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून पॅडी कांबळेची एक्झिट, फिनालेपूर्वी संधी हुकल्याने नाराजी, अश्रू अनावर
कालच्या नॉमिनेशन मधून पॅडी कांबळे यांना घराबाहेर पडावं लागलं. त्यामुळे टीम बी मधील एक स्पर्धक कमी झाला. आता अभिजीत व अंकिता यांच्या भांडणानंतर अभिजीत शेवटच्या आठवड्यात टीम बी मधून माघार घेणार का?, हा वाद कुठवर जाणार हे पाहणं रंजक ठरेल.