टेलिव्हीजनवरील ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र काही दिवसांतच यातून अनेक स्पर्धक नॉमिनेट झाले. सध्या हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आला असून ६ ऑक्टोबर रोजी महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. या चर्चा सुरु झाल्यानंतर नक्की महाअंतिम सोहळा कधी पार पडणार? याबद्दल अनेक चर्चा सुरु होत्या मात्र वाहिनीने स्वतः या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. या कार्यक्रमामध्ये सध्या ‘फॅमिली स्पेशल’ एपिसोड सुरु आहे . गुरुवारी पार पडलेल्या भागांमध्ये घरातील वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत व धनंजय पोवार यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी त्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. (bigg boss marathi new promo)
येत्या भागामध्ये उर्वरित सदस्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. याचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्कीची आई तिला भेटायला घरात आली असून काही गोष्टींचा धक्कादायक खुलासा केला असून निक्कीला मोठा धक्का बसला आहे. निक्कीच्या आईने अरबाजबद्दलच्या काही गोष्टी सांगताना दिसली ज्यामुळे निक्की खूप दु:खी झालेली दिसली. तसेच तिने अरबाजबरोबर असलेलं नातं संपवणार असल्याचेदेखील स्पष्ट केले. या प्रोमोमध्ये निक्कीची आई म्हणते.
दरम्यान हा प्रोमो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “आधी अरबाज बोलला होता की तो कमीटेड आहे. तेव्हा काही समजलं नाही का? आता सगळी नाटकं कशाला?”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “अरबाज व निक्कीने ‘बिग बॉस’चा तमाशा करुन ठेवलाय”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “खूप लवकर डोळे उघडले हिचे”, अजून एकाने लिहिले की, “सगळा महाराष्ट्र सांगत होता पण तुम्हाला कुठे कळतंय”.
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच निक्की व आरबाज यांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. त्यांच्यामध्ये जवळीकदेखील वाढल्याचे अनेकदा दिसून आले होते. जेव्हा अरबाज घराबाहेर पडला तेव्हा निक्की खूप भावुक झाल्याचेदेखील पाहायला मिळाले होते.