Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या सीझनने यापूर्वीचे सर्व टीआरपी रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अशातच गेल्या आठवड्यात अरबाज पटेलची घरातून एक्झिट झाली होती. मात्र ‘बिग बॉस मराठी’ पाचच्या सीझनच्या सुरुवातीपासूनच अरबाज पटेल हा ट्रॉफीचा दावेदार म्हणून ओळखला जात होता. घराचा कॅप्टन असतानाही अरबाजला घराबाहेर पडावं लागलं त्यामुळे त्याच जाणं हे अनपेक्षित होतं. अरबाजच्या एलिमिनेशननंतर घरातील स्पर्धकांनाही खूप मोठा धक्का बसला. निक्कीबरोबरची त्याची मैत्री होती अरबाजच्या जाण्यानंतर ती ढसाढसा रडताना दिसली.
‘बिग बॉस मराठी’मध्ये आठव्या आठवड्याच्या शेवटी धक्कादायक एलिमिनेशन पार पडले. नवव्या आठवड्यासाठी ज्याची कॅप्टन म्हणून निवड झाली होती, तो अरबाज पटेल बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडला. BB मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरबाज सोशल मीडियावर विशेष सक्रिय झाला आहे. अरबाज सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्याचे अनेक डान्स व्हिडीओ तो पोस्ट करताना दिसतो. ‘बिग बॉस’च्या घरात असताना अरबाजच्या वैयक्तिक आयुष्याची घराबाहेर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
सध्या अरबाज घराबाहेर असून तो माध्यमांना मुलाखती देताना दिसतोय. यावेळी नुकतीच त्याने फिल्मीमंत्रा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली आहे. यावेळी बोलताना अरबाजने अनेक खुलासे केले. या मुलाखतीत बोलताना अरबाज म्हणाला, “मला आता २५ वं वर्ष सुरु आहे”. म्हणजे अरबाज हा वयाने लहान आहे. २४ वर्ष त्याला पूर्ण झाले असून त्याला आता २५ वं वर्ष सुरु आहे. वयाने मोठा वाटणारा हा अरबाज मात्र वयाने लहान आहे हे आश्चर्यचकित करणार आहे.
इतकंच नव्हे तर अरबाजला तो व्यसनी आहे का?, असं विचारलं यावर उत्तर देत तो म्हणाला, “मी दारु-सिगारेटला कधीच हात लावला नाही आहे. मी चहासुद्धा कधीच पीत नाही. मला चांगले कपडे घालण्याचा आणि चांगलं दिसण्याचा खूप शॉक आहे. कारण आपण चांगले दिसणं खूप महत्त्वाचं आहे. इतकंच नव्हे तर मला चांगलं चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याची आवड आहे. आता तर मी बनवायलाही शिकलो आहे”.