बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्री पॅरिस फॅशन वीकमधून परतली असल्याचं समोर आलेल्या व्हिडीओमधून कळलं. पॅरिस फॅशन विकमधील ऐश्वर्याचा लूकही विशेष चर्चेत आला. यावेळी ऐश्वर्या एकटी नाही तर प्रत्येक वेळी मुलगी आराध्याबरोबर दिसते. आराध्या जवळपास प्रत्येक आंतरराष्ट्रीय सहलीला तिच्या आईबरोबर असते. अलीकडेच ती ऐश्वर्याबरोबर SIIMA पुरस्कार सोहळ्यातही दिसली होती. यानंतर ऐश्वर्या पुन्हा लेकीला घेऊन पॅरिसला पोहोचली. (Aishwarya Rai Bachchan Daughter Troll)
पॅरिसमधील या फॅशन शोच्या व्हिडीओमध्ये आराध्या तिच्या आईबरोबर दिसली. बुधवारी तेथून परतत असताना विमानतळावर आई वं मुलगी एकत्र दिसली आणि आता दोघी पुन्हा मायदेशी यायला निघाल्या आहेत. यावेळी ऐश्वर्या आराध्याबरोबर आयफा अवॉर्ड्ससाठी गेली होती. दोघेही विमानतळावर दिसले. आराध्याला तिच्या आईबरोबर वारंवार प्रवास करताना पाहून लोकांनी ऐश्वर्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.
कायमच ऐश्वर्या व तिची लेक आराध्याला एकत्र पाहून आता नेटकऱ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. काहींनी सांगितले की, पूर्वी लोकांना तिच्या केसांची काळजी वाटत होती आणि आता त्यांना शाळेची चिंता वाटत आहे. एका यूजरने विचारले व्हिडीओ पाहून विचारले की, “आराध्या शाळेत कधी जाते?”. तर दुसऱ्याने विचारले की, “आराध्याला शाळा नाही का? तिच्या शाळेतील लोक काही बोलत नाहीत?”. तर इतर काही लोक म्हणाले, “ऐश्वर्या आता बच्चन कुटुंबाबरोबर दिसत नाही”.
ऐश्वर्यानेही याबाबत एकदा चर्चा केली होती. ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, ती प्रवासापूर्वी पूर्ण नियोजन करते. तिने सांगितले होते की, शाळेची आठवण ठेवून ती तिच्या प्रवासाची योजना अशा प्रकारे करते की त्याचा फारसा परिणाम होणार नाही आणि आल्यावर आराध्यालाही शाळेत जाता येईल. मात्र, यावेळी आराध्या फक्त आठवड्याच्या दिवसांतच मोठ्या प्रमाणावर प्रवास करताना दिसली आहे.