रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची लगीनघाई, कोकणात कुलदैवताच्या भेटीला, पहिली पत्रिका देवाला अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 3, 2025 | 3:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actor Akshay Kelkar wedding

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची लगीनघाई, कोकणात कुलदैवताच्या भेटीला, पहिली पत्रिका देवाला अन्...

कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक रस असतो. इतकंच काय तर या मंडळींचं लग्न तर चर्चेचा विषय असतो. बरेच कलाकार आपल्या जोडीदाराविषयी मनसोक्त बोलतात. लग्न ठरलं की, सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी देतात. असंच काहीसं सरप्राइज ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरने चाहत्यांना दिलं आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या बायकोसह फोटो शेअर करत लग्न करत असल्याचं सांगितलं. आता अक्षय लग्नाच्या तयारीला लागला आहे. यादरम्यानचे बरेच व्हिडीओ तो युट्युबद्वारे शेअर करत आहे. आताही अक्षयने लग्नसंदर्भातील पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. (Marathi actor akshay kelkar wedding)

अक्षयने होणाऱ्या बायकोसह लग्नाची खरेदी केली. आता तो कोकणातल्या गावी पोहोचला आहे. दापोलीमध्ये अक्षयचं कुलदैवत आहे. विशेष म्हणजे शुभकार्य करत असताना त्याने पहिली देवाची भेट घेण्याचं ठरवलं. आईसह तो कुलदैवताला पहिली पत्रिका ठेवायला कोकणातल्या गावी गेला. तो म्हणाला, “लग्नाची पत्रिका पहिली देवाला ठेवली जाते. म्हणूनच आम्ही आमच्या कोकणातल्या गावी जात आहोत. तिथे धमाल-मस्ती करु. काही लोकांना लग्नाचं आमंत्रण देऊ”.

आणखी वाचा – Video : आकर्षक इंटेरियर, ओपन किचन अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चिपळूणमध्ये उभारलं स्वप्नातलं घर, पाहा झलक

दापोलीला पोहोचल्यानंतर त्याने मंदिरात देवासमोर पत्रिका ठेवली. त्यानंतर इतरांना आमंत्रण देण्यास अक्षयने सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याची आईही त्याच्या व्लॉगमध्ये प्रत्येक गोष्ट सांगत होती. आईने काही भाग स्वतः शूट केला. रस्त्यामध्ये अक्षयने आईसह वडापाव खाण्याचा आनंदही लुटला. मे महिन्यातच अक्षय लग्न करणार आहे. त्यापूर्वीच्या संपूर्ण विधी तो पारंपरिक रित्या पूर्ण करत आहे.

आणखी वाचा – गंभीर आजार, लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं होतं पण…; पैशांअभावी सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, कुटुंबियांना मोठा धक्का

अक्षय व त्याची होणारी पत्नी साधना यांच्या लग्नाची कुटुंबियही जोरदार तयारी करत आहेत. गेली काही वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर अक्षय व साधनाने आपलं नातं पुढे नेण्याचं ठरवलं. कुटुंबियांच्या सहमतीने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शिवाय याआधीही अक्षय बऱ्याचदा त्याच्या गर्लफ्रेंडबाबत बोलताना दिसला होता. आता अक्षयचं लग्न नक्की कधी?, कुठे असणार? हे काही दिवसांत समोर येईलच.

Tags: entertainment newsmarathi actormarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Aatli Baatmi Phutli

टायगर भाईच्या भूमिकेत विजय निकम गाजवणार मोठा पडदा, 'आतली बातमी फुटली' चित्रपटात असणार मोठं सरप्राइज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.