शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

टायगर भाईच्या भूमिकेत विजय निकम गाजवणार मोठा पडदा, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात असणार मोठं सरप्राइज

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 3, 2025 | 5:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aatli Baatmi Phutli

टायगर भाईच्या भूमिकेत विजय निकम गाजवणार मोठा पडदा, 'आतली बातमी फुटली' चित्रपटात असणार मोठं सरप्राइज

Aatli Baatmi Phutli : अभिनेते विजय निकम यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या अनेक भूमिका चित्रपटांमधून विशेष गाजल्या. आता पुन्हा एकदा ते एका नव्या चित्रपटातून हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज होत आहेत.त्यांच्या नव्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चर्चेचे कारणही अगदी तसंच आहे. ‘वीजी फिल्म्स’च्या ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात एका भाईची भूमिका विजय निकम साकारणार आहेत. ‘टायगरभाई’ असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांचा ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटातील अनुभव सांगण्याबाबत विजय निकम म्हणाले, “मी साकारलेला ‘टायगरभाई’ हा चित्रपटात खूपच धमाल करताना दिसणार आहे. ही भूमिका ग्रे शेडची असली तरी माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. त्यात विनोदी बाज असल्याने ही भूमिका करायला मजा आली. मला ‘टायगरभाई’ च्या भूमिकेत पाहणं चाहत्यांना सुद्धा आवडेल यात शंका नाही”. एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदा भोवती ‘आतली बातमी फुटली’ या सिनेमाची कथा फिरते. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकार या चित्रपटात धमाल उडवणार आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची लगीनघाई, कोकणात कुलदैवताच्या भेटीला, पहिली पत्रिका देवाला अन्…

View this post on Instagram

A post shared by Vijay Nikam (@vijaynikam4761)

‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. तर संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांची तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. तसेच संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची असून नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत.

Tags: Aatli Baatmi Phutlimarathi actorvijay nikam
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Madhuri Dixit Hair Secret

Video : लांबसडक केसांसाठी माधुरी दीक्षित करते घरगुती उपाय, घरीच बनवते तेल, व्हिडीओद्वारे दाखवली संपूर्ण झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.