शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जगाचे नियम मोडून…”, शिवानी सुर्वेसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला, “आपल्या वागण्यावर…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 29, 2023 | 2:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shivani Surve Birthday

"जगाचे नियम मोडून...", शिवानी सुर्वेसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला, "आपल्या वागण्यावर…"

मराठी मनोरंजन सृष्टीत आपला अभिनय व सौंदर्याने प्रेक्षकांना मोहित करणारा चेहरा म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे. छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी शिवानी ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. शिवाय, तिने मालिकांव्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळाली असून तिच्या सौंदर्यामुळे आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अश्या या गोड अभिनेत्रीने काल आपला वाढदिवस साजरा केला होता. अनेक कलाकार व चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. (Shivani Surve Birthday)

अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत त्याचे फोटोज व व्हिडिओज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अशीच एक पोस्ट कुशलने नुकतीच केली आहे, ज्यात त्याने शिवानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. कुशलने शिवानीसोबतचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत म्हटलंय, “बिगबॉस ह्या कार्यक्रमातून दिसलेली स्वतःच्या हक्कांसाठी राडा घालणारी, “शिवानी” आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने मला भेटलेली, प्रेमळ, मस्तीखोर, सतत नव्याच्या शोधात असलेली आणि जगाचे नियम मोडून आनंदी राहण्याची धमक असलेली “शिवानी”. ह्या दोन्हीही तिचेच स्वभाव आहेत.”

हे देखील वाचा – “महिनाभर तिच्या पायाला प्लास्टर करण्यात आलं होत…” क्रांतीच्या लेकीला दुखापत, म्हणाली “अजूनही…”

“आता ते आपल्या वागण्यावर अवलंबून आहे, की कोणती शिवानी आपल्याला भेटणार. पण एक गोष्ट महत्त्वाची की तिचे दोन्ही स्वभाव खरे आहेत, तिला फार काही खोटं वागता येत नाही. जे पोटात तेच ओठात ! जगात खूप कमी माणसं अशी आहेत. शिवानी, तू आहेस तशीच रहा कायम. वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असं कुशल म्हणाला आहे. त्याच्या या पोस्टवर शिवानीने “खूप खूप धन्यवाद तुझं, किती छान बोललास तू” अशी कमेंट केली आहे. कुशलची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा – Video : चाहतीने पाठवलेली भेटवस्तू पाहून ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी गोखले-प्रभुलकर झाली भावुक, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “इतक्या प्रेमाने…”

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

अभिनेत्री शिवानी सुर्वेने ‘देवयानी’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वामुळे चर्चेत आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला तिचा ‘वाळवी’ चित्रपट आला होता, ज्यात तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. शिवानी लवकरच कुशलबरोबर दिग्दर्शक संजय जाधव यांच्या एका चित्रपटात झळकणार असून काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले आहे. (Kushal Badrike post for Shivani Surve)

Tags: instagram postkushal badrikeshivani surveShivani Surve Birthday
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Vivek Agnihotri Resigned From Bollywood

“कलाकार मुर्ख आणि…”, ‘द कश्मीर फाइल्स’चे विवेक अग्निहोत्री बॉलिवूडवर भडकले. म्हणाले, “मी अधिक हुशार कारण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.