मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात ‘आपला माणूस’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा कलाकार म्हणजे शिव ठाकरे. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे व निरागस हास्याने शिवने अनेकांची मनं जिंकली आहेत. आपल्या डान्स व दिलखुलास स्वभावामुळे चर्चेत राहणारा शिव सोशल मीडियाद्वारेदेखील कायम चर्चेत राहत असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या या फोटो व व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच सोशल मीडियावर सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
शिव नुकताच काही कामानिमित्त गावी गेला होता. यावेळी त्याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे काही खास फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. तसेच यावेळी त्याने गावातील एका घरात प्रवेश करत एका वृद्ध महिलेबरोबर जेवण केले. यावेळी त्याने जमिनीवर बसून भाकरी बनवली. यावेळी त्याने चुलीवर अस्सल मराठी जेवण केलं. तसेच यावेळी शिवने त्या आजीबरोबर खास संवादही साधला. शिवने केलेल्या कृतीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा – मुलगी झाली हो! ‘मिर्झापूर’च्या गुड्डूभैय्याच्या घरी चिमुकलीचे आगमन, रिचा चड्ढाने दिला गोंडस मुलीला जन्म
तसेच शिवच्या या समाजभान जपणाऱ्या कृतीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘मराठी सेलिब्रिटी कट्टा’ या इन्स्टाग्राम पेजद्वारे शिवचा हा चुलीवर भाकरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओखाली शिवच्या अनेक चाहत्यांनी त्याचे या कृतीबद्दल कौतुक केले आहे. शिवच्या या व्हिडीओखाली “खूप छान”, “शिवची ही कृती आवडली”, “शिवचा हाअ साधपेणा खूपच भावतो” अशा अनेक कमेंट्स करत शिवच्या या व्हिडीओला पसंती दिली आहे.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील डॉ. हाथी आठवतायत का? १६ वर्षांपूर्वी सोडली होती मालिका, कारणही आलं समोर
दरम्यान, ‘रोडीज’ या हिंदी शोमधून शिव घराघरात पोहोचला. पुढे तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला, ज्यात तो विजयी झाला होता. तो केवळ इथपर्यंत थांबला नाही, तर हिंदी ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमात सहभागी होत त्याने आपला दमदार खेळ दाखवला. ज्यामुळे त्याचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला. या सर्व शोजमुळे त्याला ‘आपला माणूस’ अशी नवी ओळख मिळाली.