बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री रिचा चड्ढा व अली फजल यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढा व अली फजल या जोडीने चाहत्यांबरोबर ही गूडन्यूज शेअर केली आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाने १६ जुलै रोजी बाळाला जन्म दिला. यामुळे आता अभिनेत्री रिचा चड्ढा व अभिनेता अली फजल आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल आता बॉलिवूडमधील नवीन सेलिब्रिटी पालक बनले आहेत.
नुकतंच, या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनापूर्वी मॅटर्निटी फोटोशूट करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. आता त्यांनी बाळाच्या आगमनाची गोड बातमी शेअर केली आहे. रिचा व अली या जोडप्याला मंगळवारी मुलगी झाली. काही दिवसांपूर्वीच रिचा चड्ढाने प्रसूतीची वाट पाहत असताना तिच्या बाळाला ‘आजा यार’ म्हणत सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती.
आणखी वाचा – रीलच्या नादात आयुष्य गमावलं, ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
रिचा व अली पहिल्यांदाच आई-बाबा झाले असून, अभिनेत्रीने लेटेस्ट पोस्टमध्ये सुंदर असे ४ फोटो शेअर केले आहेत. ज्यामधील एका फोटोत तिने बेबी बम्पवर हात ठेवून हार्टशेप तयार केला होता, तर फोटोंमध्ये अलीने तिच्या बेबी बम्पवर हात ठेवलेला पाहायला मिळाला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये रिचाने या प्रवासात साथीदार बनून नेहमी पाठिशी असणाऱ्या अलीचे आभार मानले. तसेच तिने फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरचेही या पोस्टमधून आभार मानले होते.
दरम्यान, रिचा चड्ढा व अली फजल यांनी ४ ऑक्टोबर २०२२ रोजी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली होती. त्यांनी दिल्लीत त्यांच्या लग्नाचा प्री-वेडिंग सोहळा केला होता. त्यानंतर लखनऊमध्ये मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य विवाहसोहळा पार पडला. मग रिचा-अलीने मुंबईत रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.