रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मधील डॉ. हाथी आठवतायत का? १६ वर्षांपूर्वी सोडली होती मालिका, कारणही आलं समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 18, 2024 | 5:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
dr. hathi on taarak mehta ka oolta chashma

‘तारक मेहता...’मधील डॉ. हाथी आठवतायत का? १६ वर्षांपूर्वी सोडली होती मालिका, कारणही आलं समोर

टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका अधिक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमधील सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या अधिक लक्षात आहेत. जेठालाल गाडा, दयाबेन, बापुजी, भिडे गुरुजी यांच्या भूमिकेला आजवर खूप प्रेम मिळाले आहे. डॉ. हाथी ही सगळ्यांचीच एक लोकप्रिय भूमिका आहे. ही भूमिका अभिनेता निर्मल सोनी यांनी साकारली होती. त्यांनी अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात नाव कमावलं आहे. या मालिकेत येण्यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. (dr. hathi on taarak mehta ka oolta chashma)

‘तारक मेहता…’ या मालिकेमुळे त्यांना अधिक ओळख मिळाली. मात्र त्यांनी २००८ साली ही मालिका सोडली आणि पुन्हा एकदा २०१८ साली ते पुन्हा या मालिकेमध्ये  परतले. पण इतके वर्ष मालिकेत न दिसण्याचे काय कारण होते? याबद्दल जाणून घेऊया. निर्मल यांच्या ‘तारक मेहता…’ मधील भूमिकेला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. एका वेळी तब्बल १५-२० जणांचा एक ग्रुप त्यानच्या मागे पडला होता. याबद्दल ते म्हणाले की, “शरद संकला व मी गुजरातमध्ये एका इव्हेंटमध्ये सहभागी झालो होतो. तेव्हा खूप गर्दी झाली होता. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही तिथून निघालो त्यानंतर आम्ही कसेतरी बाहेर पडलो. पण आम्ही कारमधून बाहेर पडलो तेव्हा १५-२० जण आमचा पाठलाग कारायले लागले. त्यांनी सुमारे १० किलोमीटरपर्यंत आमचा पाठलाग केला. पण त्यांना लागू नये असं आम्हाला वाटत होतं”.

आणखी वाचा – मुलगी झाली हो! ‘मिर्झापूर’च्या गुड्डूभैय्याच्या घरी चिमुकलीचे आगमन, रिचा चड्ढाने दिला गोंडस मुलीला जन्म

View this post on Instagram

A post shared by Nirmal Soni (@nirmalsoni1)

‘तारक मेहता…’ हे पहिल्यांदा डॉ. हाथी यांची भूमिका करत होते. मात्र २००८ साली त्यांनी हा शो सोडला. त्यानंतर रवी कुमार हे ती भूमिका करु लागले. पण त्यानच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा निर्मल यांना या भूमिकेसाठी विचारले गेले आणि ते या शोमध्ये पुन्हा काम करु लागले. त्यांनी एकदा एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, “मी एकाच वेळेला वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करु शकत नव्हतो”.

आणखी वाचा – रीलच्या नादात आयुष्य गमावलं, ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

पुढे ते म्हणाले की, “त्यावेळी माझ्याकडे दोन पर्याय होते. म्हणजेच मी एकतर ‘तारक मेहता…’साठी काम करु शकत होतो किंवा हे सोडून इतर प्रोजेक्टवर काम करु शकणार होतो. त्यामुळे मी ‘तारक मेहता…’ सोडण्याचा निर्णय घेतला”. मात्र १० वर्षांनी पुन्हा ते या मालिकेमध्ये परत आले आणि त्यांनी पुन्हा कधीही ही मालिका न सोडण्याचा निर्णय घेतला.

Tags: dr.haathinirmal soniserialtaarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi fame Shiv Thakare sitting on the floor and helping an old woman to make food video viral on social media

Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याचा साधेपणा, जमिनीवर बसून वृद्ध महिलेला स्वयंपाकात मदत केली अन्...; चाहत्यांकडून कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.