पंगाक्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगणा याआधी अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. अशातच ती आता खासदार म्हणून संसदेत प्रवेश करत आहे. पण त्यापूर्वी ही अभिनेत्री आणखी एका वेगळ्या कारणामुळे बरीच चर्चेत आली आहे. चंदीगढ विमानतळावर एका सुरक्षारक्षक महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर कंगनाचे तिचा संतापही व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणाची सध्या बरीच चर्चा असून या CISF महिला सुरक्षा रक्षकावर कारवाईही चालू आहे. याबद्दलच्या अनेक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत.
अशातच सोशल मीडियावरील एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे आणि हा व्हिडीओ शेअर केला आहे अभिनेते किरण माने यांनी. किरण माने हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावर अनेक मार्मिक पोस्ट शेअर करत ते आपली राजकीय भूमिका मांडत असतात. अशातच तेंनी कंगणाचाही एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगणा तर दिसत आहेच. पण या व्हिडीओ आणखी एक व्यक्ती दिसत आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस.
किरण माने यांनी देवेंद्र फडणवीस व कंगणा यांचा व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओच्या मागे ‘खेळ मांडला’ हे गाणं वाजताना दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी “हे मागे बसलेल्या कंगनासाठी आहे. गैरसमज नसावा. कुठल्याही ऐर्यागैर्यांवर व्हिडीओ टाकत नाही आपण” लिहिलं आहे. त्यामुळे किरण मानेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, या व्हिडीओमधून किरण माने यांनी कंगणासह देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधल्याचे दिसत आहे. यासंदर्भात नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली अनेक कमेंट्सही केल्या आहेत. “एक तीर से दो निशाने”, “या व्हिडीओमध्ये प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे थोबाडीत खाणारे २ लोकं दिसलेत”, “Reel आणि real मध्ये चपराक बसलेले दोघे या व्हिडीओमध्ये आहेत”. अशा आशयाच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलेल्या . आहेत