बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा व भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे सध्या त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या येण्याने अधिक चर्चेत आहेत. यायाआधी विराट व अनुष्काला एक मुलगी असून तिचे नाव वामिका असे आहे. वामिकाच्या जन्मानंतर खूप काळ दोघांनीही मुलीचा चेहरा माध्यमांसमोर येऊ दिला नव्हता. त्यानंतर वामिका ३ वर्षाची होताच दोघांनी दुसरे मुलं जन्माला येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर १५ फेब्रुवारीला अनुष्काने लंडन येथे मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अकाय असे ठेवण्यात आले. मुलाच्या येण्याची बातमी अनुष्का व विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. (anushka sharma and virat kohli daughter)
कोहली कुटुंबामध्ये चिमुकल्याचे आगमन झाल्याने सगळ्यांनीच कोहली कुटुंबाचे अभिनंदन केले होते. पण अकायच्या जन्मानंतर अनुष्का व विराट हे भारतात दिसले नाहीत. ते आता आपल्या दोन्ही मुलांबरोबर लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण या चर्चावर अनुष्का व विराट यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सध्या विराट T20 वर्ल्डकपसाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. त्याच्याबरोबर अनुष्का, वामिका व अकाय हेदेखील आहेत. सध्या या कुटुंबाचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
A few days before Virushka and Vamika were spotted at the Team Hotel 🥰❤️ pic.twitter.com/kv6uBSPJti
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 7, 2024
या व्हिडीओमध्ये विराट व अनुष्का यांच्यापेक्षा त्यांची मुलगी वामिकाची चर्चा सर्वाधिक सुरु आहे. आतापर्यंत विराट व अनुष्काने मुलीला लाईमलाइटपासून दूर ठेवले आहे. समोर आलेला व्हिडीओ हा न्यूयॉर्क येथील हॉटेलमधील आहे. क्रिकेटच्या सरावातून वेळ काढत विराट पत्नी व मुलांबरोबर वेळ घालवत आहे.सदर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का व विराट आपल्या लहानग्या मुलीबरोबर दिसून येत आहेत. दोघांनीही वामिकाचे हात पकडले असून तिला चालत घेऊन जाताना दिसत आहेत.वामिकाने पांढऱ्या रंगाचा टॉप व जीन्स घातलेली दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.
तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये विरुष्का व वामिका स्पॉट झाले होते”. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “वामिका किती गोड दिसत आहे”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “तिचे बांधलेले केस किती गोड दिसत आहेत”.
अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, वामिकाच्या जन्मानंतर ती अभिनयापासून थोड्या प्रमाणात लांब असलेली दिसून आली. सध्या ती चित्रपटनिर्मितीमध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत.