शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : देवेंद्र फडणवीसांच्या मागे बसलेली कंगणा रणौत, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने ‘खेळ मांडला’ गाणं लावत बनवला व्हिडीओ, म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
जून 8, 2024 | 3:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi fame Kiran Mane shared a Subtle video of Devendra Fadnavis and Kangana Ranaut.

Video : देवेंद्र फडणवीसांच्या मागे बसलेली कंगणा रणौत, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने ‘खेळ मांडला’ गाणं लावत बनवला व्हिडीओ, म्हणाला...

पंगाक्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगणा याआधी अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. अशातच ती आता खासदार म्हणून संसदेत प्रवेश करत आहे. पण त्यापूर्वी ही अभिनेत्री आणखी एका वेगळ्या कारणामुळे बरीच चर्चेत आली आहे. चंदीगढ विमानतळावर एका सुरक्षारक्षक महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर कंगनाचे तिचा संतापही व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणाची सध्या बरीच चर्चा असून या CISF महिला सुरक्षा रक्षकावर कारवाईही चालू आहे. याबद्दलच्या अनेक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत.

अशातच सोशल मीडियावरील एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे आणि हा व्हिडीओ शेअर केला आहे अभिनेते किरण माने यांनी. किरण माने  हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावर अनेक मार्मिक पोस्ट शेअर करत ते आपली राजकीय भूमिका मांडत असतात. अशातच तेंनी कंगणाचाही एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगणा तर दिसत आहेच. पण या व्हिडीओ आणखी एक व्यक्ती दिसत आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

आणखी वाचा – लग्नानंतर बायकोसह नेपाळला पोहोचला प्रथमेश लघाटे, पारंपरिक नव्हे तर मुग्धा वैशंपायनच्या मॉर्डन लूकने वेधलं लक्ष, धमाल-मस्ती अन्…

किरण माने यांनी देवेंद्र फडणवीस व कंगणा यांचा व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओच्या मागे ‘खेळ मांडला’ हे गाणं वाजताना दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी “हे मागे बसलेल्या कंगनासाठी आहे. गैरसमज नसावा. कुठल्याही ऐर्‍यागैर्‍यांवर व्हिडीओ टाकत नाही आपण” लिहिलं आहे. त्यामुळे किरण मानेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “आपल्याच लोकांशी आपला लढा”, दमदार डायलॉगबाजी असलेला ‘आम्ही जरांगे’चा ट्रेलर प्रदर्शित, सुबोध भावे, प्रसाद ओकचीही दिसली झलक

दरम्यान, या व्हिडीओमधून किरण माने यांनी कंगणासह देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधल्याचे दिसत आहे. यासंदर्भात नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली अनेक कमेंट्सही केल्या आहेत. “एक तीर से दो निशाने”, “या व्हिडीओमध्ये प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे थोबाडीत खाणारे २ लोकं दिसलेत”, “Reel आणि real मध्ये चपराक बसलेले दोघे या व्हिडीओमध्ये आहेत”. अशा आशयाच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलेल्या . आहेत  

Tags: entertainment newskiran manemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
anushka sharma and virat kohli daughter

Video : इतकी मोठी झाली आहे अनुष्का शर्मा व विराट कोहलीची लेक, दुसऱ्या बाळानंतर पहिल्यांदाच समोर आला व्हिडीओ, रंगली चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.