मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जेवणाच्या वेळा चुकल्या, धावपळ-दगदग झाली आणि…; सूरज चव्हाणच्या लग्नानंतर जान्हवीची पहिली प्रतिक्रिया, हॉस्पिटलमध्ये दाखल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 4, 2025 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
jahnavi killekar news

जेवणाच्या वेळा चुकल्या, धावपळ-दगदग झाली आणि…; सूरज चव्हाणच्या लग्नानंतर जान्हवीची पहिली प्रतिक्रिया, हॉस्पिटलमध्ये दाखल…

jahnavi killekar news : ‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाण काही दिवसांपासून चर्चेत आहे. 29 नोव्हेंबर 2025 रोजी सूरज चव्हाणचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. चाहत्यांची तोबा गर्दीही यावेळी पाहायला मिळाली. तर सूरजच्या लग्नाला अनेक कलाकार मंडळीही उपस्थित होती. सूरजच्या लग्नात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर भलताच भाव खाऊन गेली. करवलीच्या रुपात सूरजने भरपूर मिरवलं. ‘बिग बॉस’मुळे जान्हवीबरोबर सूरजची ओळख झाली, हे बहीण-भावाचं नातं त्यांनी घराबाहेरही जपलं. भावाच्या लग्नासाठी जान्हवी वेळात वेळ काढून त्याच्या गावी पोहोचली. आणि यावेळी तिने बहिणीची सर्व कर्तव्ये पार पाडली. एवढेच नव्हे तर या लग्नसोहळ्यानंतर तिची तब्येत बिघडली होती. जान्हवीची जेव्हा तब्येत बिघडली होती, तेव्हा तिने हॉस्पिटलमधील बेडवरुन काही फोटो शेअर केले होते.

आता तब्येत ठीक झाल्यानंतर जान्हवीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि या व्हिडीओमधून तिने पुन्हा एकदा तिच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. जान्हवी म्हणाली, “हाय हॅलो नमस्कार! व्हिडीओ बनवण्यामागचं कारण की, आता माझी तब्येत एकदम उत्तम आहे. मी पूर्णपणे बरी झाली आहे. फार काही झालं नव्हतं. बरेच दिवस शूटिंग, इव्हेंट्स होते, सूरजचं लग्न होतं. त्यामुळे खूप धावपळ आणि दगदग झाली. मी खूप प्रवास केला, जेवणाच्या वेळा चुकल्या, झोप पूर्ण नाही. सूरजच्या लग्नात मी खूप मजा केली. खूप नाचले. त्यामुळे जरा थकवा आला होता. मला लो बीपीचाही त्रास आहे, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पण मला संपूर्ण महाराष्ट्राला धन्यवाद म्हणायचं आहे, कारण सूरजच्या लग्नाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसं आली होती. फक्त त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी खूप लोक आले होते”.

आणखी वाचा – “तो दिवस नसता आला तर…”, पूर्णा आजीच्या आठवणीत सायली भावुक, मालिकेला तीन वर्ष पूर्ण होताच म्हणाली, “एक नकोशी आठवण…”

View this post on Instagram

A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

पुढे ती म्हणाली, “आज सूरजचे आई-बाबा या जगात नाही आहेत, पण मला हे सांगताना अभिमान वाटतोय की, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून माणसं आलेली. जे त्याचे आई, बाबा, बहीण, भाऊ, मित्र बनून आले होते. हे खूप कौतुकास्पद आहे आणि असं नशीब फार कमी लोकांना मिळतं. जे आमच्या सूरजला मिळालं आहे. मला सूरजच्या लग्नात खूप मजा आली. मला त्यांचे रितीरिवाज कळले, काही पद्धती आमच्याकडे होत नाहीत त्या समजल्या. त्याच्या प्रत्येक विधी मी एन्जॉय केल्या, खूप मजा आली, खूप नाचले, धमाल केली”.

आणखी वाचा – ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन

शेवटी जान्हवी म्हणाली, “सूरज आणि माझं बॉण्डिंग आता इतकं घट्ट झालंय की, मी प्रत्येक विधीला त्याच्यासोबत होते. खरंच हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. सूरजसोबत मलाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं, बरीच नवीन नाती मिळाली, सूरजच्या बहिणी मला मला माझ्या बहिणींसारख्याच झाल्या. अनेक नवी नाती मला मिळाली, वेगवेगळ्या विधी समजल्या”.

Tags: jahnavi killekarmarathi actressSuraj Chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Sunny Deol Angry On Paparazzi

"किती पैसे हवेत?" धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनावेळी सनी देओलची पापाराझींवर संतप्त प्रतिक्रिया; कॅमेरा खेचला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.