सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हजारो झाडं जळून खाक, असंख्य पशू-पक्षी होरपळले आणि…; सयाजी शिंदेंच्या ‘देवराई प्रकल्पाला’ भीषण आग, नेमकं काय झालं?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 25, 2025 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 Sayaji Shinde

हजारो झाडं जळून खाक, असंख्य पशू-पक्षी होरपळले आणि…; सयाजी शिंदेंच्या 'देवराई प्रकल्पाला' भीषण आग, नेमकं काय झालं?

 Sayaji Shinde : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या बीड तालुक्यातील पालवन परिसरातील ‘ सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे डोंगरावरील हजारो झाडे, औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही आग संपूर्ण सह्याद्री देवराईमध्ये पसरली. स्थानिक नागरिकांनी तातडीने वन विभागाला याची माहिती देत वन विभागाचे लगेचच अधिकारी आणि कर्मचारी तिथे पोहोचले. स्थानिक ग्रामस्थ आणि वन कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. पण आग विझवण्यात मोठे अडथळे येत असल्याचं समजत आहे.

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी प्रचंड मेहनत केली होती.या देवराईत अनेक दुर्मिळ झाडांची जोपासना केली जात होती. परंतु, या आगीत अनेक पक्ष्यांची घरटी, अंडी आणि जमिनीवरील लहान जीवजंतू मृत्युमुखी पडल्याची दाट शक्यता आहे. दरवर्षी उन्हाळ्यात डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढतं आहे. टँकरच्या पाण्यावर ही झाडे लहानाची मोठी केली, पण आज ती डोळ्यादेखत जळताना पाहून मन हेलावून जात आहे, अशी भावना पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष; फोटो समोर

सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर या आगीमुळे अक्षरशः पाणी फेरलं गेलं आहे. काल सायंकाळच्या सुमारास पालवन डोंगररांगेत अचानक धुराचे लोट दिसू लागले.

Tags: fire newsmarathi actorsayaji shinde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Marathi education benefits

"मराठी शाळेची अवस्था…", अक्षय केळकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, "माझं कुठेच काहीच अडलं नाही कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.