सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे पर्व मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या कार्यक्रमामध्ये आजवर अनेक ट्विस्टदेखील पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत यामधून ४ स्पर्धकांना निरोप देण्यात आलं आहे. दर आठवड्याला या कार्यक्रमामध्ये स्पर्धकांनी संपूर्ण आठवड्यात काय काय केले? याची चर्चा केली जाते. तसेच दर शनिवारी ‘भाऊचा धक्का’ हा कार्यक्रम केला जातो. या आठवड्यातील एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये रितेश आर्याला सुनावताना दिसत आहे. (bigg boss new promo)
नवीन प्रोमोमध्ये रितेश आर्याला बोलत आहे की, “तुमचा खेळ निक्कीशिवाय दिसत नाही”. त्यावर आर्या उत्तर देते की, “निक्कीमुळे समस्या निर्माण होतात आणि त्यावर आम्ही फक्त प्रतिक्रिया देतो”, त्यावर रितेश म्हणतो की “आम्ही नाही फक्त तुम्ही,तुम्ही फक्त स्वत:बद्दल म्हणा” पुढे आर्या असं म्हणते की “निक्की माझा गेम नाहीये”. यावर रितेश तिला म्हणाला की, “तुम्हाला असं वाटतं की, निक्की तुमचा गेम नाही. आत्ता तुम्ही दिसताय ते फक्त निक्कीमुळेच. त्यामुळे मला इथे सांगू नका तुम्ही कशा दिसताय”.
दरम्यान आजच्या भाऊचा धक्क्यावर रितेश आर्यासह सर्वच सदस्यांची शाळा घेणार असल्याचे दिसून येत आहे. अरबाजचं राग व त्रास खोटा असल्यावरून रितेश अरबाजलाही सुनावणार असल्याचे दिसून येत आहे. तर आर्यालाही तो निक्कीचा गेम म्हणत तिची शाळा घेणार आहे. त्यामुळे आजचा भाऊचा धक्का चांगलाच गाजणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान जो प्रोमो समोर आला आहे त्यावर नेटकऱ्यांनीदेखील अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हंटलं की, “हे पर्व तुम्ही फक्त निक्कीला प्रमोट करण्यासाठी केलं आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “आता समजले की निक्की बिग बॉस आहे म्हणून वोटिंग बंद केली”, “आर्याने फक्त निक्कीला टार्गेट केलं तर निक्की टॉपमध्ये जाईल आणि आर्या बाहेर पडेल लवकरच. कारण हिचा स्वतःचा गेमच नाहीये”, त्यानंतर अजून एकाने लिहिले की, “आम्हाला माहीत होतं की रितेश निक्कीच्या बाजूने आहे”.