सध्या मल्याळम चित्रपटसृष्टीमधून धक्कादायक खुलासे होत आहेत. अनेक अभिनेत्यांवर व मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या सगळ्यामध्ये आता दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांनी उडी घेतली आहे, त्यांनी या सगळ्या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. मोहनलाल हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. त्यामुळे आता मल्याळी मनोरंजन क्षेत्राबद्दल जे खुलासे होत आहेत त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आरोपीना योग्य ती शिक्षा व्हावी असेही वक्तव्य केले आहे. (mohanlal on malyalam film indusrty)
मोहनलाल यांनी शनिवारी या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की जर कुणी काही चुकीचे केले असेल आणि त्यांच्या विरोधात काही पुरावे असतील आरोपीना कठोर शिक्षा व्हावी. त्यांनी हेमा समितीच्या अहवालाबद्दल केरळ सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दलदेखील भाष्य केले. ते म्हणाले की, “आम्ही तुम्हाला विनंती करतो की सर्व लक्ष AMMA (मल्याळम मुव्ही आर्टिस्ट असोसिएशन) वर देऊ नका. आरोपांची तपासणी होत आहे. कृपया मनोरंजनसृष्टीला बदनाम करु नका”.
त्यानंतर ते म्हणाले की, “हेमा समितीचा अहवाल बरोबर असलेच, तसेच हे सगळं करण्याचा निर्णय सरकारचा होता आणि तो निर्णय योग्यच आहे. हे प्रश्न प्रत्येकाला विचारता येणार नाहीत. या क्षेत्रात खूप मेहनती लोक आहेत. पण प्रत्येकाला दोषी मानता येणार नाही. तपास सुरु आहे आणि आरोपींना शिक्षा होणारच”.
पुढे ते म्हणाले की, “जे लहान कलकार आहेत त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे. आम्ही तपासामध्ये शक्य ती सगळी मदत करु. आम्ही योग्य ते सगळे प्रयत्न करु. मात्र मी अजूनपर्यंत हेमा समितीचा अहवाल वाचला नाही”. दरम्यान मल्याळम मनोरंजन क्षेत्रामधून अनेक अभिनेत्री समोर आल्या आहेत. यामध्ये त्यांनी अभिनेत्यांवर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले आहेत. महिलांनी त्यांच्यावर झालेल्या आत्याचाराला न्याय मिळावा न्याय मिळावा अशी मागणीदेखील केली आहे.