शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रडतात सगळेच दिसले फक्त मीच”, Bigg Boss Marathi मधून बाहेर आल्यानंतर योगिता चव्हाणचे खुलासे, म्हणाली, “आतमध्ये खूप काही घडत असतं पण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 19, 2024 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 Yogita Chavan first reaction she shared her journey in the house

Bigg Boss Marathi 5 मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री योगिता चव्हाणची पहिली प्रतिक्रिया, घरातील प्रवासाबद्दल अनेक खुलासे

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या रविवारच्या ‘भाऊचा धक्का’मध्ये प्रेक्षकांबरोबरचं स्पर्धकांनादेखील धक्का मिळाला हा धक्का म्हणजे एकाच वेळी दोन स्पर्धकांचे झालेले एलिमिनेशन. दर आठवड्याच्या रविवारी एलिमेशन पार पडते आणि या पर्वाचे दुसरे एलिमिनेशन काल पार पडले असून या एलिमिनेशनमध्ये निखिल दामलेसह योगिता चव्हाणदेखील घराबाहेर पडली.  नॉमिनेशन टास्कमध्ये ‘बिग बॉस’ने एक नवीन ट्विस्ट आणत या घरातून आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा दूसरा स्पर्धक कोण? याविषयी सर्वांना धाकधुक लागून राहिली होती. अशातच ‘बिग बॉस’ने या घरातील दुसऱ्या एलिमिनेशनची घोषणा केली. या दुसऱ्या एलिमिनेशनमध्ये घरातून योगिता चव्हाण ही स्पर्धक घराबाहेर पडली आहे. (Bigg Boss Marathi 5 Yogita Chavan)

घराबाहेर पडल्यानंतर नुकताच योगिताने माध्यमांशी संवाद साधला. तिने घरातील दोन आठवड्यांमध्ये तिला आलेले अनुभव शेअर केले. यावेळी योगिताला घरातील तिच्या प्रवासाबाबत विचारण्यात आलं. याबद्दल ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिने असं म्हटलं की, “प्रवास खूप चांगला होता. पहिले दोन ते तीन दिवस मला रमायला वेळ लागला. पहिल्या नॉमिनेशन टास्कनंतर खूप चांगले मित्र-मैत्रिणी मला तिथे भटले. टास्कमध्ये मी दिसायचे. टास्क खेळायचा ते मला माहित होतं. तिथे मी छान दिसायचे. पण राजकारण करावं लागतं तिथे मी कमी पडले. टीव्हीवर फक्त एक तास ‘बिग बॉस’ असतो. मात्र तिथे आम्ही चोवीस तास असतो”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने सुसंस्कृत म्हटलं पण सूरजने ‘त्या’ कृतीमधून केलं सिद्ध, अभिनेत्रीने राखी बांधताच पाया पडला अन्…; महाराष्ट्राला कौतुक

यापुढे ती असं म्हणाली की, “या घरात खूप काही गोष्टी घडत असतात. बाहेरुन बघून जेवढं मला सोपं वाटलेलं तेवढं ते अजिबात नव्हतं. घरामध्ये जी भांडणं होतात, कुटुंबापासून लांब राहतात, घरातील स्पर्धक याचा सामना करत लढत आहेत. मी फक्त एकटी रडली नाही तिकडे सगळे रडले आहेत. पण काही लोक दिसले काही दिसले नाहीत. बऱ्याच गोष्टी बाहेर दिसत नाहीत. आतमध्ये खूप आरडाओरडा, भांडणं असतात. तासाभरात जितकं दाखवता येईल तितकं दाखवलं जातं. मला तसा वैयक्तिक कोणी फार त्रास दिला नाही. माझा स्वभावच असा आहे की, इतरांना भांडताना बघून मला खूप वाईट वाटायचं. त्याचाच जरा मला त्रास झाला”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “ये शेंबडी, चल हट”, निक्की-जान्हवीची घरात पुन्हा दादागिरी, दोघींचा तोच अवतार पाहून प्रेक्षक म्हणाले, “यांचा माज…”

दरम्यान, घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, योगिता, निखिल व अभिजीत हे चार स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत होते. यापैकी सूरज व अभिजीत हे दोघे सुरक्षित झाले. पण निखिल व योगिता हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत होते. तसंच गेले काही दिवस योगिता या घरात तिला राहायचे नसल्याचे म्हणत होती. “मला ही ट्रॉफी नको, मला घरी जायची इच्छा आहे” असं म्हणत तिने मला या घरातून बाहेर जायचे असल्याची विनंती ‘बिग बॉस’ला केली होती आणि अखेर तिचा या घरातील प्रवास संपला आहे.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi Newsyogita chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
yogita chavan on Bigg Boss Marathi season 5

Bigg Boss Marathi : “गळा आवळला, दुखापतीचा निक्कीचा हेतू अन्…”, योगिताने सांगितलं तेव्हा नक्की काय घडलं?, इजा झालेलीही दाखवली आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.