yogita chavan on Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सर्वच स्पर्धक उत्तम खेळ खेळताना दिसत आहेत. यंदाच्या या पर्वात अभिनेत्री योगिता चव्हाण स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र काल झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेतून योगिताला घराबाहेर पडावं लागलं. अवघे चार आठवडे योगिताचा ‘बिग बॉस’चा घरातील प्रवास पाहायला मिळाला. पहिले दोन आठवडे योगिता अत्यंत शांत व संयमी असलेली दिसली. त्यांनतर मात्र टास्क दरम्यान योगिताने स्वतःला सिद्ध केले. टास्क दरम्यान योगिता उत्तम खेळ खेळलेली दिसली. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की, जान्हवी यांनी योगिताला खाली पाडलं आणि तिला खेचलं. हे योगिताला सहन झालं नाही शेवटी योगिताने तिचा इंगा दाखवत निक्की व जान्हवी यांच्यावर पलटवार केला.
हा धाकड गर्लचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. योगिता निक्की व जान्हवीला पुरुन उरलेली दिसली. दरम्यान, योगिताची एक्झिट झल्यानंतर प्रेक्षकांनी, तिच्या चाहते मंडळींनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. उत्तम खेळ खेळत असूनही योगिताला घराबाहेर का पडावं लागलं असा सवालही अनेकांनी केला. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की व जान्हवीशी लढताना योगिताला दुखापतही झाली. या परिस्थितीबाबत आता योगिताने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
कॅप्टन्सी टास्कमध्ये योगिता व निक्की-जान्हवीमध्ये राडा झाला. याचबाबत योगिताला विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “हो मला मानेला दुखापत झाली. आता जरा कमी झालं आहे. पण जेव्हा ते लागलं होतं तेव्हा खूप दुखत होतं. पण ठिक आहे तो टास्कचाच एक भाग आहे. तिथे अशाप्रकारचे टास्क आहेतच. त्यामुळे ती खरी परिस्थिती आहे. खेळले, थोडं लागलं पण तो खेळाचाच एक भाग आहे असं मी समजते. फक्त जी खेचाखेच होत होती त्यामध्ये गळा आवळला जात होता. मला असं सांगायचं आहे की, मला फ्रेंच फ्राइजपर्यंत पोचू न देणे हाच निक्कीचा उद्देश हवा होता. पण कुठेतरी मला शारीरिक दुखापत झाली पाहिजे हा तिचा हेतू होता असं मला वाटलं”.
पुढे ती म्हणाली, “तिला मला शांतपणे थांबवता आलं असतं. पण निक्कीने माझी हुडी पकडून गळ्याभोवती आवळणं हे सुरुच ठेवलं. तिचा ड्रेस छोटा होता म्हणून ते मला करता येत नव्हतं आणि मला तसं वागणंही योग्य वाटत नव्हतं. जेवढं जसं मला जमलं तेवढं मी केलं, तिला जे जमलं ते तिने केलं. प्रेक्षकांनीही ते सगळं बघितलं आणि आता सगळेच ठरवत आहेत त्यांना जे काही ठरवायचं आहे”.