Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. हा शो सुरु होईन नुकताच एक आठडवा पूर्ण झाला आणि पहिल्या दिवसापासूनच घरात सहभागी झालेले १६ स्पर्धक एकमेकांशी वाद घालत असल्याचं पाहायला मिळालं. अशातच काल या घरात पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला आणि यात अंकिता वालावालकर ही घराची पाहिली कॅप्टन झाली. कॅप्टन्सी टास्कचं नाव ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं होतं. मात्र या टास्कमुळे घरातील स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली. एकीकडे नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव आणि जान्हवी यांचा राग अनावर होतो. (Bigg Boss Marathi 5 update)
‘बिग बॉस’च्या घरात होणाऱ्या वाद व भांडणात ‘बिग बॉस’चे चाहते ज्याप्रकारे बाहेरून सहभागी होत असतात. तसंच काही कलाकार मंडळीदेखील यात सहभागी होतात आणि त्यांना न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल ते आपली मतं व्यक्त करत असतात. पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदे, किरण माने, मीरा जगन्नाथ यांसह इतर कलाकार मंडळीही ‘बिग बॉस’च्या घरात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीबद्दल आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक जय दुधाणेने बिग बॉसच्या कालच्या भागाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काल (मंगळवार) झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज पटेलने खेळलेल्या खेळाबद्दल जयने आपलं मतं व्यक्त केलं आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “या शेंबड्या अरबाजसाठी वैभव चव्हाणला ‘वाघनखं घेऊन पाठवलं होतं. पण भाई आपला ते वाघनखं घरीच ठेवून आला आहे”. तसंच त्याने आणखी एक स्टोरी पोस्ट करत अरबाजवर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “अरबाज दोन मिनिटांआधी बोलला की “गेम काय असतं हे मी तुम्हाला दाखवतो आणि कॅप्टन्सीसाठी भीक मागत आहे”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : छोटा पुढारीला कोसळलं रडू, शेवटी धनंजय पोवारनेच दिली साथ, म्हणाला, “माझ्या घरच्यांना…”
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला काल अंकिता वालावलकर म्हणून पहिला कॅप्टन मिळाला. त्यामुळे अंकिता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरणार आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या ती कशी पूर्ण करणार? कामे वाटताना घरातील सर्व सदस्यांना समान न्याय देईल का? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.