शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi :  “या शेंबड्या अरबाजसाठी…” अरबाजच्या वागणूक व अरेरावीवर भडकला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “नंतर भीक मागत…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 7, 2024 | 10:19 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 yesterday captaincy game marathi actor Jay Dudhane shared a post about Arbaaz Patel and Vaibhav Chavan

Bigg Boss Marathi 5 मधील मंगळवारच्या कॅप्टन्सी टास्कवरुन जय दुधाणेचा अरबाज पटेलला टोला

Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. हा शो सुरु होईन नुकताच  एक आठडवा पूर्ण झाला आणि पहिल्या दिवसापासूनच घरात सहभागी झालेले १६ स्पर्धक एकमेकांशी वाद घालत असल्याचं पाहायला मिळालं. अशातच काल या घरात पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला आणि यात अंकिता वालावालकर ही घराची पाहिली कॅप्टन झाली. कॅप्टन्सी टास्कचं नाव ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं होतं. मात्र या टास्कमुळे घरातील स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली. एकीकडे नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव आणि जान्हवी यांचा राग अनावर होतो. (Bigg Boss Marathi 5 update)

‘बिग बॉस’च्या घरात होणाऱ्या वाद व भांडणात ‘बिग बॉस’चे चाहते ज्याप्रकारे बाहेरून सहभागी होत असतात.  तसंच काही कलाकार मंडळीदेखील यात सहभागी होतात आणि त्यांना न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल ते आपली मतं व्यक्त करत असतात. पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदे, किरण माने, मीरा जगन्नाथ यांसह इतर कलाकार मंडळीही ‘बिग बॉस’च्या घरात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीबद्दल आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक जय दुधाणेने बिग बॉसच्या कालच्या भागाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांचं खरं आडनाव आलं समोर, लग्नानंतर बदललेल्या नावाचा स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या…

काल (मंगळवार) झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज पटेलने खेळलेल्या खेळाबद्दल जयने आपलं मतं व्यक्त केलं आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “या शेंबड्या अरबाजसाठी वैभव चव्हाणला ‘वाघनखं घेऊन पाठवलं होतं. पण भाई आपला ते वाघनखं घरीच ठेवून आला आहे”. तसंच त्याने आणखी एक स्टोरी पोस्ट करत अरबाजवर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “अरबाज दोन मिनिटांआधी बोलला की “गेम काय असतं हे मी तुम्हाला दाखवतो आणि कॅप्टन्सीसाठी भीक मागत आहे”      

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : छोटा पुढारीला कोसळलं रडू, शेवटी धनंजय पोवारनेच दिली साथ, म्हणाला, “माझ्या घरच्यांना…”

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला काल अंकिता वालावलकर म्हणून पहिला कॅप्टन मिळाला. त्यामुळे अंकिता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरणार आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या ती कशी पूर्ण करणार? कामे वाटताना घरातील सर्व सदस्यांना समान न्याय देईल का? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Tags: Arbaaz Patelbigg boss marathi 5jay dudhane
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update todays episode

Paaru Marathi Serial :  अहिल्यादेवींकडून खास पाहुण्यांचा पाहुणचार अन्…; पारूच्या आदित्यवरील प्रेमाचं सत्य प्रितमसमोर येणार का?, मालिकेत नवं वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.